बीड - जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यामुळे बीड (Beed) जिल्ह्यात शेतकरी (Farmer) आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. अतिवृष्टीने उभे पिक उध्वस्त झाल्याने, शेतकरी आत्महत्याकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलय. (Beed Farmer News)
अमोल रानमारे आणि अर्जुन धोत्रे असे आत्महत्या करुन जिवन संपविलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. तर या दोन्ही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, यामुळं आत्महत्या केल्याचं समोर आलंय.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचं अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आला. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, असं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं. मात्र दिवाळीच्या सणाला शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीची दमडीही मिळाली नाही. यामुळं जगावं कसं ? या विवंचनेत असलेला शेतकरी आता आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. यामुळं मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यात निसर्ग संकटाने शेतकरी भरडला जात आहे. मात्र सरकार आणि सरकारमधील मंत्री हे केवळ राजकारणात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी पुरता हातबल झाला असून आत्महत्या सारखं टोकाचे पावले उचलत आहे. यामुळे मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना धीर आणि आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.