Sheezan Khan In Khatron Ke Khiladi 13 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sheezan Khan In KKK 13: जेलमधून बाहेर पडताच शिजानचे नशीब पालटले; आता थेट झळकणार...

तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खानने तब्बल अडीच महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्याच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Sheezan Khan In Khatron Ke Khiladi 13: तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ माजली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचा को-स्टार शिजान खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तुनिषाच्या परिवाराने तिच्या आत्महत्येला शिजानलाच जबाबदार ठरवले होते.

अभिनेता शीजान खान तुरुंगातून सुटल्यानंतर लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शीजान शेवटचा 'अली बाबा: दास्तान ए काबुल' या मालिकेमध्ये झळकला होता. सुमारे तो अडीच महिने तुरुंगात होता. मार्च महिन्य़ामध्ये त्याची सुटका झाली असून सर्वांनाच तो आता कोणत्या मालिकेत किंवा कोणत्या चित्रपटात दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. सध्या सर्वत्र शीजान खान 'खतरों के खिलाडी 13' मध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

शीजान खान रोहित शेट्टीच्या स्टंट संबंधित आधारित असलेल्या शोमध्ये झळकणार आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये ॲक्शन दाखवणार असल्याची सध्या चर्चा होत आहे. शीजानविरुद्ध न्यायालयात खटला सुरू असून, न्यायालयाने त्याला भारताबाहेर प्रवास करण्यासाठी बंदी घातली आहे. या शोसाठी त्याने कोर्टात याचिका दाखल करून भारताबाहेर जाण्याची परवानगी मागितली आहे.

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार आणि सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “होय, शीझान खानची न्यायालयात बोलणी सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की तो या सीझनचा भाग असेल. त्याने उच्च न्यायालयात प्रवास आणि इतर कागदपत्रांशी संबंधित याचिका दाखल केली आहे. अहवालानुसार, या प्रकरणावर आज म्हणजेच 29 एप्रिल 2023 रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी शीजान किंवा त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Bollywood Film)

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धक KKK 13 च्या शूटिंगसाठी अर्जेंटिनाला रवाना होणार आहेत. नायरा बॅनर्जी, अर्चना गौतम, शिव ठाकरे, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, अरिजित तनेजा, अंजली आनंद, शरद मल्होत्रा, मुनावर फारुकी, प्रिन्स नरुला आणि अंजली अरोरा या सेलिब्रिटींची नावं या शोमध्ये समोर येत आहेत. (Bollywood Actor)

तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी शीजान खानवर होता. 'अली बाबा'चा लीड स्टार शीजान आणि तुनिशा रिलेशनशिपमध्ये होते. शीजन तुनिषाची फसवणूक करत होता, असा आरोप तुनिषाच्या आईने केला होता. तुनिशाला हे कळताच शीजानने तिच्याशी संबंध तोडले. यामुळे तुनिशा खूप नाराज झाली होती, आणि तिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपले जीवन संपवले. शीजान सुमारे अडीच महिने तुरूंगात आपली शिक्षा भोगत होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात शीजानची तुरुंगातून सुटका झाली होती. (Bollywood News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT