7 years Of Sairat: सैराटाला ७ वर्षे पूर्ण! आर्ची-परश्याचं याड अजून संपेना; आकाश ठोसरची पोस्ट व्हायरल

Akash Thosar Post: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आकाशने सैराटला ७ वर्ष पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे.
7 years Of Sairat
7 years Of Sairat Instagram @akashthosar
Published On

Akash Thosar Celebrated 7 years of Sairat: आर्ची आणि परश्या यांची आपल्याला ओळख झाली ती सैराट या चित्रपटुन. आज या चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. असे असले तरी या चित्रपटाची, चित्रपटाच्या कलाकारांची आणि सैराट या गाण्याची क्रेज कमी झालेली नाही. आर्ची आणि परश्यानी पोस्ट करत त्यांच्या ७ वर्ष आठवणींना पुन्हा उजाळा दिल आहे.

आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू आणि परश्या म्हणजे आकाश ठोसर यांनी पोस्ट करत त्यांच्या या चित्रपटाच्या ७ व्या वर्षपुर्तीनिमित्त पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आकाशने सैराटला ७ वर्ष पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये तिच्या सहकलाकार आकाश ठोसरशी कोलॅब्रेशन केले आहे.

आकाशने ठोसरने सैराट चित्रपटातील त्याचे रिंकू राजगुरूसोबतचे फोटो शेअर केले आहेत. आकाशने ५ फोटोंची शृंखला शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये रिंकू लाल साडीमध्ये दिसत आहे. तर आकाशने सफेद सदरा घातला आहे आणि दोघे खळखळून हसत आहेत.

दुसऱ्या फोटोमध्ये रिंकूने पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या चुडीदार ड्रेस घातला असून आकाशने निळ्या रंगाचा चेक्सका शर्ट आणि जीन्स घातली आहे. तिसऱ्या फोटो हा त्यांच्या चित्रपटातील लग्नाच्या सीनचा फोटो आहे.

चौथ्या फोटोमध्ये आर्चीने (रिंकूने) परशाच्या (आकाश) गळ्यात हात टाकला आहे आणि दोघेही बसले आहेत. तर पाचवा फोटो या चित्रपटातील रिंकूचा डोहाळ जेवणाचा फोटो आहे. ज्यात रिंकूने हातात धनुष्यबाण पकडले आहे.

तर या फोटोंना कॅप्शन देत आकाशने लिहिले आहे, सैराटची ७ वर्ष, अविस्मरणीय प्रवास, २९ एप्रिलला सैराटला ७वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच आकाश ठोसरने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, सैराटचे पोस्टर शेअर करत सैराटची ७ वर्ष असे कॅप्शन त्या पोस्टला दिले आहे.

रिंकू आणि आणि आकाश यांनी सैराट या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com