Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरुख खानला मिळणार महाराष्ट्र सरकारकडून कोट्यवधी; कारण ऐकून व्हाल थक्क

Shahrukh Khan: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. लवकरच महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला कोट्यवधी रुपये देणार आहे. काय आहे यामागच नेमक कारण जाणून घ्या

Shruti Vilas Kadam

Shahrukh Khan: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा अशा कलाकारांपैकी एक आहे जो त्याच्या त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. आता देखील त्याच्या राहत्या घरामुळे चर्चेत आहे. शाहरुख खान मुंबईत "मन्नत" या आलिशान घरात राहतो, मन्नत पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात.

कारण मुंबई वांद्रे पश्चिम येथील मन्नत बंगल्यामुळे शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान अधिक श्रीमंत होणार आहेत. येत्या काळात, शाहरुख खान आणि गौरी खान यांना या मन्नत घरासाठी महाराष्ट्र सरकारकडून सुमारे ९ कोटी रुपये मिळू शकतात.

खरंतर, महाराष्ट्र सरकार शाहरुख खानची पत्नी गौरी खानची सुमारे ९ कोटी रुपये परत करण्याची मागणी करणारी याचिका मंजूर करू शकते. ही याचिका गौरी खानने मुंबई उपनगर (एमएसडी) विरोधात दाखल केली आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्यांचे घर मन्नत ज्या जमिनीवर बांधले आहे त्यासाठी एमएसडीच्या कलेक्टरला अतिरिक्त पैसे देण्यात आले होते. आता महाराष्ट्र सरकारने हे पैसे त्याला परत करण्याचा निर्णय घेतला होता.

'मन्नत' कोणाच्या नाववर?

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड येथे असलेला शाहरुख खानचा मन्नत बंगला त्याची पत्नी गौरी खानच्या नावावर आहे. ज्या जमिनीवर हा आलिशान बंगला बांधला आहे ती जमीन महाराष्ट्र सरकारने मागील मालकाला भाड्याने दिली होती. महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर जमीन मालकाने ती मालमत्ता शाहरुख खानला विकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT