Shahid Kapoor Kareena Kapoor IIFA 2025: २५ वा आयफा (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी) पुरस्कार सोहळा ८ आणि ९ मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत अभिनेता कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यासोबत शाहिद कपूर आणि करीना कपूर खान उपस्थित होते. संपूर्ण करुकर्म सुरळीत सुरु असताना अचानक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या कार्यक्रमता जुने प्रेमी शाहिद कपूर आणि करीना एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत.
या आयफा पुरस्कार २०२५ कार्यक्रमात शाहिद आणि करीनाचे एकमेकांना मिठी मारताना आणि छान संवाद साधतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या दोन्ही स्टार्सनी २००४ मध्ये रोमँटिक थ्रिलर 'फिदा' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांना डेट करायला सुरूवात केली आणि 'जब वी मेट' या रोमँटिक चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या नात्यादरम्यान, शाहिद आणि करीना बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत होते.
जयपूरमधील त्यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, त्यांच्या चाहत्यांनी शेअर केले आहे की त्यांना त्यांना पुन्हा चित्रपटांमध्ये एकत्र पहायचे आहे. त्यापैकी एकाने लिहिले, "कृपया त्यांना एका रोमँटिक चित्रपटात कास्ट करा", तर दुसऱ्याने जोडले, "हा चमत्कार आहे, ते एकमेकांसाठी बनले आहेत." "गीत और आदित्य का पुनर्मिलन हो गया" अशी टिप्पणी देखील एका कमेंटमध्ये लिहिली गेली आहे.
शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीरा राजपूतशी लग्न केले आणि या कपलला दोन मुलं आहेत. एक मुलगी मीशा कपूर आणि एक मुलगा झैन कपूर. दुसरीकडे, करीना कपूरने २०१२ मध्ये सैफ अली खानशी लग्न केले आणि त्यांना तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोन मुले आहेत.
दरम्यान, आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये शाहरुख खान, कृती सेनन आणि माधुरी दीक्षित नेने यांचेही परफॉर्मन्स होणार आहेत. हा सोहळा ८ मार्च रोजी आयफा डिजिटल अवॉर्ड्स २०२५ आणि रविवार, ९ मार्च रोजी, २०२४ मधील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपट आणि कामगिरीचा सन्मान करणारे मुख्य आयफा अवॉर्ड्स होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.