Shah Rukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

Mannat Diwali Party : यंदा शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर दिवाळी पार्टी होणार नाही. या मागचे मुख्य कारण जाणून घेऊयात. शाहरुख खानच्या घरातील दिवाळी पार्टी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.

Shreya Maskar

दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी दिवाळी पार्टी करताना दिसत आहे.

मात्र यंदा शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर दिवाळी पार्टी होणार नाही.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याच्या लेकाचा आर्यन खानचा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे बाप-लेकाच्या जोडीचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटी दिवाळी पार्टी करताना दिसत आहे. दरवर्षी 'मन्नत'मध्ये देखील मोठी दिवाळी पार्टी आयोजित केली जाते. या पार्टीला बॉलिवूडचे सेलिब्रिटी उपस्थित राहतात.

मीडिया रिपोर्टनुसार, यंदा शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात येणार नाही आहे. 'मन्नत'चे (Mannat Diwali Party ) दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे शाहरुख खानने हा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या 'मन्नत'मध्ये काम सुरू असल्यामुळे मुंबईच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरात एका आलिशान अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत आहेत. 'मन्नत' बंगला पुन्हा नव्याने तयार झाल्यावर खान कुटुंब 'मन्नत'मध्ये शिफ्ट होईल.

'मन्नत' बंगल्यातील दिवाळी पार्टी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अख्खा बॉलिवूड या पार्टीमध्ये येतो. तसेच शाहरुख खान प्रत्येक सेलिब्रिटीसोबत येथे वेळ घालवताना दिसतो. शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

वर्कफ्रंट

शाहरुख खान आता लवकरच 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'किंग' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'किंग'मध्ये शाहरुख खानसोबत त्याची लेक सुहाना खान देखील झळकणार आहे. 'किंग' 2027 ला प्रदर्शित होणार असल्याचे बोले जात आहे. अलिकडेच शाहरुख खान लेकाचा चित्रपट 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये देखील झळकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna : "मेरी जान"; रश्मिकाला पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

SCROLL FOR NEXT