Richest Man of Bollywood: शाहरुख खान नव्हे तर हा आहे बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत स्टार; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

Richest Man of Bollywood: शाहरुख खानला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत माणूस मानले जाते. पण हे खरे नाही. त्याच्यापेक्षा एका प्रसिद्ध व्यक्तीने संपत्तीत त्याला मागे टाकले आहे.
Richest Man of Bollywood
Richest Man of BollywoodSaam Tv
Published On

Richest Man of Bollywood: काही दिवसांपूर्वी हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ जाहीर झाली, यामध्ये शाहरुख खानला सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले. त्याची एकूण संपत्ती अंदाजे १.४ अब्ज डोलर्स म्हणजेच १२,४९० कोटी इतकी होती. जुही चावलाची संपत्ती ७,७९० कोटी इतकी होती आणि हृतिक रोशनची संपत्ती २,१६० कोटी इतकी होती. पण आता, बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीची संपत्ती १.५ अब्ज असल्याचे वृत्त आहे, म्हणजेच त्याने किंग खानलाही मागे टाकले आहे. या व्यक्तीने कधीही अभिनय, दिग्दर्शन किंवा चित्रपटात काम केलेले नाही.

हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ आणि फोर्ब्सनुसार, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती रॉनी स्क्रूवाला नावाचा निर्माता आणि उद्योगपती आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे १.५ अब्ज म्हणजेच १३,३०० कोटी इतकी आहे. संपत्तीच्या बाबतीत त्याने शाहरुख खानला मागे टाकले आहे.

Richest Man of Bollywood
Actor scandal: 'दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेला...', प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे पुन्हा गंभीर आरोप, रडत म्हणाली...

आदित्य चोप्रा आणि भूषण कुमार यांचाही उल्लेख नाही

टी-सीरीजचे मालक भूषण कुमार आणि आदित्य चोप्रा हे दोन सर्वात यशस्वी चित्रपट निर्माते आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८,०००-१०,००० कोटी आहे. पण, यादीत त्यांची नाव नमूद केलेली नाहीत. शिवाय, अमिताभ बच्चन १,६३० कोटींच्या एकूण संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत, तर करण जोहर १,८८० कोटींच्या एकूण संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

Richest Man of Bollywood
Kantara Chapter 1: बक्कळ कमाई करणाऱ्या ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा खास सन्मान; राष्ट्रपती भवनात 'कांतारा'ची विशेष स्क्रिनिंग

रॉनी स्क्रूवालाचे प्रॉडक्शन हाऊस आणि फिल्म्स

रॉनी स्क्रूवालाने १९८० च्या दशकात टूथब्रश बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९९० मध्ये यूटीव्हीची स्थापना केली, सुरुवातीला एक टीव्ही स्टुडिओ आणि नंतर एक चित्रपट निर्मिती कंपनी. याद्वारे त्यांनी "लक्ष्य," "स्वदेश," "रंग दे बसंती," "जोधा अकबर," आणि "फॅशन" सारखे चित्रपट तयार केले. २०१२ मध्ये यूटीव्हीने डिस्नेसोबत अब्ज डॉलर्सचा करारही केला आणि त्यानंतर निर्मात्याने आरएसव्हीपी मूव्हीजची स्थापना केली. यामध्ये त्यांनी 'केदारनाथ," "उरी," आणि "सॅम बहादूर" सारखे चित्रपट तयार केले. असे म्हटले जाते की रॉनी स्क्रूवालाचे अर्धे उत्पन्न त्याच्या इतर व्यवसायांमधून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com