Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

Shocking News a Man Died due to Rasgulla: रसगुल्ला खाल्ल्याने एका तरुणाचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. ४१ वर्षीय तरुणाने रसगुल्ला खाल्ला.यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास झाला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

लग्नाच्या पंगतीत जेवतानाच एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रसगुल्ला खाल्ल्याने तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या तरुणाने लग्नात जेवताना रसगुल्ला खाल्ला होता. रसगुल्ला खाताना त्याचा श्वास कोंडला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रसगुल्ला हा जास्त मोठा असतो. झारखंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ४१ वर्षीय ललित सिंहच्या घशात रसगुल्ला अडकला त्यामुळे त्याला श्वास घेता आला नाही. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे पाहून इतर लोकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा त्याचा दूदैवी मृत्यू झाला होता. या घटनेने लग्नसोहळ्यात गोंधळ निर्माण झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com