Shah Rukh Khan:शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर अचानक अधिकारी धडकले, नेमकं काय घडलं? | VIDEO

Shah Rukh Khan Mannat Bungalow: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर CRZ नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली असून, महापालिकेच्या पथकाने बंगल्याची पाहणी केली आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळख असणाऱ्या आणि ज्याचे कोट्यवधीने फॅन फॉलोवर्स आहे असा शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता देखील किंग खान एका प्रकरणात अडकला आहे. मागच्या काही दिवसांपासून शाहरुखच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अशातच अचानक शाहरुखच्या बंगल्यावर BMC चे कर्मचारी पोहोचले. बंगल्याच्या नूतनीकरण दरम्यान CRZ म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोन नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मुंबई महापालिकेकडे ही तक्रार दाखल केली आहे. शाहरुखचा बंगला मन्नत हा ग्रेड 3 हेरिटेज स्ट्रक्चर्सपैकी एक आहे. म्हणून बंगल्यात कोणतेही मोठे बदल करण्यासाठी त्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेच्या पथकाने पाहणी केली असून शाहरुखच्या टीमने नियम पाळल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com