पुण्याच्या कुख्यात गुंडाचा सोलापूरमध्ये एन्काऊंटर, शाहरुख शेखला ऑन दी स्पॉट उडवलं; धाडसी पोलिसाला किती लाखांचं बक्षीस?

Pune : पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेख सोलापूरमध्ये एन्काउंटदरम्यान मारला गेला होता. या कारवाईत सामील असणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकातील पोलिसांनी बक्षीस मिळाले आहे.
Pune News
Pune Newsx
Published On

पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेखचा काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे एन्काउंट झाला होता. या घटनेनंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने शाहरुखला शोधून काढत कारवाई केली होती. त्यांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करत आयुक्तांनी त्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

शाहरुख शेख हा पुण्यात सराईत गुन्हेगारांपैकी एक होता. त्याच्या विरोधात खून, दरोडा, गोळीबार यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांना गुंगारा देत शाहरुख सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात आपल्या नातेवाईकांकडे लपून बसला होता. त्याच्या नातेवाईकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक तात्काळ सोलापूरकडे रवाना झाले.

Pune News
Shocking : प्लीज खा ना...वहिनीला आईस्क्रीम देणं दीराला भोवलं, भावाच्या डोक्यात सनक अन् जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले

गुन्हे शाखेच्या पथकाने शाहरुख ज्या ठिकाणी लपला होता, त्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहताच शाहरुखने गोळीबार करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरात गोळीबार केला. या गोळीबारादरम्यान शाहरुख खानला चार गोळ्या लागल्या. एन्काउंटरमध्ये तो जागीच ठार झाला.

Pune News
सोनमचं भयंकर रूप उघड; लग्नाआधी तीनदा, लग्नानंतर चौथ्यांदा आखला होता राजाच्या हत्येचा कट, आताही वाचला असता तर...

शाहरुखचे एन्काउंट करणाऱ्या पोलिसांना १ लाख रुपयांचे बक्षीस पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाला आयुक्तांकडून बक्षीस मिळाले आहे. सोलापूरमध्ये शाहरुख खानचा एन्काउंट गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने केला होता. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Pune News
Doomsday Fish : त्सुनामी अन् विध्वंसक भूकंपाचे संकट, समुद्रातून मिळाले संकेत, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com