Shruti Vilas Kadam
करिश्मा कपूरने अलीकडेच परिधान केलेल्या साडीच्या लूकमध्ये पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचा एक सुंदर मिलाफ दिसला. तिच्या या अंदाजाने फॅशन प्रेमींना भुरळ घातली आहे.
करिश्माने शेअर केलेले हे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं आणि साडीतील अदाकारीचं कौतुक केलं आहे.
या फोटोंमध्ये करिश्मा पारंपरिक साडीमध्ये दिसत असली तरी तिच्या लूकमध्ये बोल्ड आणि क्लासी असा परिपूर्ण समतोल आहे. तिच्या डोळ्यांतला आत्मविश्वास आणि पोझिंगचा अंदाज प्रत्येक फोटोमध्ये झळकतो.
करिश्माच्या या फोटोंवर चाहत्यांकडून “गॉर्जियस”, “एलिगंट”, “टाईमलेस ब्यूटी” अशा कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तिच्या फॅशन सेन्सला प्रेक्षकांकडून दाद मिळते आहे.
करिश्माचा हा लूक पारंपरिक साड्यांवर प्रयोग करायला आवडणाऱ्या तरुणींना प्रेरणा देतोय. तिच्या या फोटोंमुळे “बोल्ड पण एलिगंट” असा नवा ट्रेंड तयार होत आहे.
साडी, दागिने आणि तिच्या मेकअपमधला संतुलन तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत आहे. साधेपणातही ती ग्लॅमरस दिसते, हे तिच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य ठरतं.
करिश्मा कपूर वर्षानुवर्षं ग्लॅमर इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिचा प्रत्येक लूक मग तो पारंपरिक असो वा वेस्टर्न चाहत्यांसाठी फॅशन स्टेटमेंट ठरतो. साडीतील हा अंदाजही त्याला अपवाद नाही.