Shah Rukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'किंग' चित्रपटात ब्रॅड पिटचा लूक केलाय कॉपी? दिग्दर्शकांनी दिलं सोडेतोड उत्तर

Shah Rukh Khan- King Look : शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. यातील शाहरुख खानचा लूक ब्रॅड पिटच्या लूकची कॉपी असल्याचे बोले जात आहे. तुलना करणाऱ्यांना दिग्दर्शकांनी उत्तर दिले आहे.

Shreya Maskar

शाहरुख खानचा 'किंग' 2026 मध्ये रिलीज होणार आहे.

शाहरुख खानच्या 'किंग'मधील लूकची तुलना ब्रॅड पिटच्या लूकसोबत केली आहे.

'किंग' च्या फर्स्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'किंग' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानने आपल्या वाढदिवसाला 'किंग' चा फर्स्ट लूक आउट केला आहे. 'किंग'च्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र शाहरुख खान आता 'किंग'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाहरुखच्या 'किंग' चित्रपटातील लूकची तुलना हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट (Brad Pitt) यांच्यासोबत केली आहे.

ब्रॅड पिटचा काही दिवसांपूर्वी 'एफ 1' चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटातील एका सीनसाठी ब्रॅड पिटने ज्या रंगाचे शर्ट आणि पॅन्ट घातला आहे. तसाच सेम लूक 'किंग' चित्रपटात शाहरुख खानने केला आहे. निळ्या रंगाचे शर्ट आणि ब्राऊन रंगाचे जॅकेट, डोळ्यांना काळा गॉगल, हातात बॅग, स्टायलिश हेअर असा दोघांचा सेम लूक पाहायला मिळत आहे. नेटकरी सोशल मीडियावर शाहरुख खानच्या या लूकची तुलना करत आहे.

शाहरुखच्या या लूकवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तुलना करणाऱ्या नेटकऱ्यांना दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की,

"आजकाल द्वेष करणाऱ्यांचे मजेदार तर्क...जर बॉलिवूड चित्रपटात असे असेल तर,

फायटर जेट - टॉप गनची कॉपी

शिप - टायटॅनिकची कॉपी

समान ड्रेस कोड - F1 ची कॉपी

केशरी ड्रेस - हिंदूविरोधी

त्यांचा आयक्यू लेव्हल 1947 पासून बफरिंगसारखा आहे..."

'किंग' चित्रपट

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार धुमाकूळ घालणार आहेत. 'किंग' हा सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग' चित्रपट 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्याचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

SCROLL FOR NEXT