७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
शाहरुख खानला 'राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर करण्यात आला.
'राष्ट्रीय पुरस्कार' जिंकल्यावर शाहरुख खानने आपल्या भावना व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ( 71st National Award) घोषणा 1 ऑगस्टला करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला मिळाला. त्यामुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'जवान' (jawan ) चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणेनंतर शाहरुख खानने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शाहरुख खानने आभार मानणारा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शाहरुख खानच्या हाताला प्लास्टर लागलेले दिसत आहे. शाहरुखने व्हिडीओला खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "राष्ट्रीय पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद... ज्युरी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार... इस सम्मान के लिए भारत सरकार का धन्यवाद. माझ्यावर झालेल्या प्रेमाने भारावून गेलो आहे. आज सर्वांना मिठी..." शाहरुख खानच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार यांच्या कडून प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाहरुख खानने व्हिडीओमध्ये सर्वांचे आभार मानले आहे. 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शक, लेखक आणि संपूर्ण टीमचे शाहरुखने विशेष आभार मानले आहेत. तसेच शाहरुखने आपल्या कुटुंबाचे देखील आभार मानले आहेत. त्याचे कुटुंब या प्रवासात त्याच्यासोबत होते. प्रेक्षकांनी दिलेल्या भरपूर प्रेमाचे देखील शाहरुखने कौतुक करून आभार मानले आहेत. लवकर बरा होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करायला लवकर येणार असल्याचे सांगितले आहे. शाहरुख खान 33 वर्षांनंतर पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.
'किंग' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खानच्या हाताला दुखापत झाली आहे. 'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली कुमार यांनी केले. तसेच शाहरुख खाननंतर बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसीला देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विक्रांत मेसीला 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 12th Fail या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला जाहीर झाला आहे. 'मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला पुरस्कार मिळणार आहे.
शाहरुख खानला कोणत्या चित्रपटासाठी 'राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला?
जवान
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला?
राणी मुखर्जी
शाहरुख खानला कोणत्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली?
किंग
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.