Indrayani : व्यंकू महाराजांचे इंदूने मानले आभार, 'इंद्रायणी'च्या आनंदाला लागणार ग्रहण? पाहा VIDEO

Indrayani Marathi Serial Update :'इंद्रायणी' मालिकेत सध्या गुरुपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळत आहेत. इंद्रायणीसमोर आता कोणते नवीन संकट येणार, जाणून घेऊयात.
Indrayani Marathi Serial Update
Indrayani SAAM TV
Published On

'इंद्रायणी' (Indrayani ) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत येणाऱ्या भाग खूपच रंजक असणार आहेत. येणाऱ्या भागांमध्ये भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास जिथे श्रद्धा, परंपरा, आणि कर्तव्य पाहायला मिळणार आहे. शकुंतलाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर इंद्रायणी भावपूर्ण कृतज्ञतेने विठुरायाचे आभार मानते. व्यंकू महाराजांचा विठ्ठलावरचा विश्वास पुन्हा जागा होतो पण जेव्हा व्यंकू आणि गोपाळ डॉक्टर विठ्ठलचा आभार मानण्यासाठी रुग्णालयात जातात, तेव्हा डॉक्टरच गायब असतो.

मालिकेत डॉक्टर वैंगणकर एक धक्कादायक सत्य उघड करतात. त्यांनी असा कोणताही डॉक्टर पाठवलेला नसल्याचे सांगतात. डॉक्टर विठ्ठल कोण होता? हा प्रश्न सगळ्यांना विचारात टाकतो. आता मालिकेत गुरुपौर्णिमानिमित्त इंद्रायणीचे खास कीर्तन पाहायला मिळणार आहे, ज्याद्वारे ती गुरु महात्म्य देखील सांगणार आहे.

आषाढी वारीतून यशस्वी दर्शन घेऊन आलेला अधोक्षज शकुंतलासाठी पंढरपूरहून पवित्र अबीर आणि प्रसाद घेऊन येतो. पण गोपाळ केवळ औषधांवर विश्वास ठेवत असल्यामुळे अधोक्षजला अडवतो. इंद्रायणी गोपाळला स्पष्ट शब्दांत इशारा देते की, अधोक्षजचा अपमान सहन केला जाणार नाही. गुरूपौर्णिमेच्या दिवशी इंद्रायणी पहाटे विठुरायाची पूजा करून आपल्या गुरू व्यंकू महाराजांचे आशीर्वाद घेते. संध्याकाळी ती आपल्या गुरूप्रणीत कीर्तन परंपरेत नवा अध्याय सुरू करते. गुरु व्यंकू महाराजांचे मनोभावे पाद्यपूजन करते.

व्यंकू महाराज तिला 'कीर्तनकार' परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरित करतात. हा क्षण इंद्रायणीसाठी अत्यंत गौरवाचा असतो, पण आनंदाला लगेच ग्रहण लागतं आनंदीला हे सगळं खटकते. गुरुपौर्णिमेच्या पार्शवभूमीवर इंद्रायणी शाळेचे आणि गुरुचे महत्व सांगणारे एक विशेष कीर्तन सादर करणार आहे. पण तिच्या कीर्तनाच्या दरम्यान कोणते नवीन विघ्न येणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळते.

Indrayani Marathi Serial Update
Dilip Joshi : 45 दिवसांत 16 किलो वजन घटवलं, वाचा जेठालालचा फिटनेस फंडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com