Akola : अकोल्यातील जवान नितेश घाटे यांना अयोध्येत वीरमरण; कर्तव्यावर असताना दुर्दैवी घडलं

Akola News : अयोध्या येथे कर्तव्यावर असतांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. भारतीय सैन्यात गेल्या १५ वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते. उद्या कुरणखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणारा आहे.
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 
अकोला
: अयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना कुरणखेड येथील जवानाला वीरमरण आले आहे. कर्तव्य बजावत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने जवान नितेश घाटे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांचे पार्थिव उद्या मूळ गावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

अकोला जिल्ह्यातील कुरणखेड या गावातून अनेक सैनिक सीमेवर आपली सेवा देत असतात. कुरणखेड ही भूमी शहीद सैनिक त्याचबरोबर आजी- माजी सैनिकांच्या नावाने प्रचलित आहे. या ठिकाणातील भूमिपुत्र नितेश घाटे याना काल वीरमरण आल्याची बातमी समोर येत आहे. इंडियन आर्मी पुलगावच्या अंतर्गत येत असलेल्या अकोला जिल्हामधील कुरणखेड या गावचे भूमिपुत्र असलेले नितेश मधुकर घाटे हे गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय सैन्यात फाईव्ह मराठा बटालियनमध्ये सेवा देत आहेत. 

Akola News
Nanded Accident: भीषण अपघात! ड्रायव्हर तर्राट, कारवरचा ताबा सुटला; समोर येईल ते वाहन उडवलं

कर्तव्यावर असताना बसला विद्युत शॉक

निलेश घाटे यांची गेल्या काही दिवसापासून अयोध्या येथे त्यांची ड्युटी सुरू होती. मात्र २८ जुलैला आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना विद्यूत शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कुरणखेड येथे पोहोचताच संपूर्ण कुरणखेड गावात शोककळा पसरली आहे. घाटे परिवारात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून कुरणखेड गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोकांकळा पसरली आहे. उद्या कुरणखेड येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. 

Akola News
Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

सैन्य दलातील मोठ्या भावाचाही अपघाती मृत्यू  

कुरणखेड येथील शेतकरी मधुकर घाटे हे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती करून संसार चालवत आहे. त्यांनी आपल्या तीन मुलांना शिकविले. एक मुलगा शेतकरी आहे. तर मोठा मुलगा संदीप घाटे हा सुद्धा आर्मीमध्ये सेवा बजावत होते. सेवा संपल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या घटनेवर काही वर्ष उलटल्यानंतर काल लहान मुलगा नितेश घाटे यांना सुद्धा आपल्या कर्तव्यावर असताना अयोध्या येथे वीरगती प्राप्त झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com