Sarfira Trailer  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sarfira Twitter Review : स्वप्न उरी बाळगणाऱ्या 'सरफिरा' जेंटलमनची कथा प्रेक्षकांना भावली, अक्षय कुमारवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Sarfira Twitter Review : गेल्या काही दिवसांपूर्वीच 'सरफिरा'चा ट्रेलर रिलीज झाला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता होती. अनेक फॅन्सने चित्रपट पाहिल्यानंतर एक्सवर रिव्ह्यू लिहिला आहे.

Chetan Bodke

अक्षय कुमारच्या 'सरफिरा' चित्रपटाची उत्सुकता शिगेला लागली आहे. आज संपूर्ण भारतात हा चित्रपट रिलीज झाला आहे. अक्षय कुमार, राधिका मदान, सीमा बिस्वास, परेश रावल अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता होती. अनेक फॅन्सने हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी एक्सवर रिव्ह्यू लिहिला आहे.

सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या 'सरफिरा' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेता सुर्याची पत्नी ज्योतिका हिने चित्रपटासाठी अक्षय कुमारला शुभेच्छा दिलेल्या आहेत. " खूप जबरदस्त चित्रपट, सकारात्मक चित्रपट, डाऊन टू अर्थ माणसाची चित्रपटाची कथा आहे."

अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. "खूप चांगला चित्रपट. मी खूप दिवसांनी इतका सकारात्मक चित्रपट पाहिला आहे. सकारात्मक कथानक असलेले चित्रपट थिएटरमध्येच पाहावे. प्रत्येकानेच चित्रपट पाहावे, अशी चित्रपटाची कथा आहे." अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. "अनेक दिवसांनंतर अक्षय कुमारचा उत्तम चित्रपट रिलीज झालेला आहे.

खूप मोठ्या काळानंतर तो चांगल्या भूमिकेत दिसत आहे. त्यासोबतच राधिका मदान, सीमा बिस्वास आणि परेश रावल यांनीही चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारली आहे. " अशी प्रतिक्रिया एका युजरने केली आहे.

विशेष म्हणजे, चित्रपटामध्ये टॉलिवूड अभिनेता सुर्या सुद्धा दिसणार आहे. त्याने चित्रपटामध्ये, कॅमिओ रोल साकारला आहे. सध्या त्याच्या एन्ट्रीची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अनेक युजर्सने सुर्याच्या एन्ट्रीवर भाष्य केलेले नाही. कारण त्याच्या एन्ट्रीची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. विशेषत: प्रेक्षकांकडून चित्रपटाचे कथानकाचे कौतुक होत आहे. एका सामान्य माणसाने पाहिलेलं स्वप्न तो कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल. मिडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी ५ ते ६ कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता चित्रपट दमदार कमाई करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

SCROLL FOR NEXT