Prathamesh Laghate - Mugdha Vaishampayan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prathamesh Laghate - Mugdha Vaishampayan: वाङ्निश्चय! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने गुपचूप उरकला साखरपुडा?, फोटो आले समोर...

Prathamesh Laghate - Mugdha Vaishampayan News: प्रथमेश आणि मुग्धाच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Priya More

Prathamesh And Mugdha Engagement:

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (saregampa) फेम प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) - मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. प्रथमेश आणि मुग्धाने काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जात होते.

प्रथमेश आणि मुग्धा लग्न करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. अशामध्ये त्यांच्या साखरपुडा आणि लग्नाविषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. अशामध्ये प्रथमेश आणि मुग्धाने गुपचूप साखपुडा केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथमेश आणि मुग्धा यांनी आपआपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो पोस्ट केले आहेत. दोघांनीही हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'वाङ्निश्चय' असं लिहिलं आहे. हे फोटो पाहून दोघांनीही गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'मेड फॉर इच ऑदर', 'खूप मस्त', 'अभिनंदन' अशाप्रकारच्या कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुग्धाने पिवळ्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाऊज असा लूक केला आहे. तर प्रथमेशने मरून रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर टोपी असा लूक केला आहे. दोघेही या फोटोंमध्ये एकमेकांकडून हसताना दिसत आहेत. दोघेही खूपच आनंदीत असल्याचे या फोटोवरून दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत मुग्धा आणि प्रथमेश यांनी कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी पोस्ट करत एकमेकांप्रती प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर ओळख होऊन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार निवडणारी प्रथमेश आणि मुग्धा ही दुसरी जोडी आहे. यापूर्वी रोहित आणि जुईली यांची या शोच्या मंचावर भेट झाली. आधी मैत्री नंतर प्रेम असं करत दोघांनी लग्न केले. त्यानंतर प्रथमेश आणि मुग्धा यांची जोडी जमली आणि अखेर त्यांनी आता साखपुडा केल्याची चर्चा आहे. ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

प्रथमेश लघाटेने १५ जूनला आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मुग्धासोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. मुग्धाचा हात हातत घेऊन प्रथमेशने पोझ देतानाचा हा फोटो त्याने पोस्ट केला होता. या फोटोला त्याने कॅप्शन दिलं होतं की, 'Okayy! So! तुम्ही आमच्याकडून ज्या बातमीची अपेक्षा करत होता..तर Finally!!आमचं ठरलंय!❤️' अशापद्धतीने त्याने प्रेमाची कबुली दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT