Vaibhavi Upadhyay Last Social Media Post Instagram
मनोरंजन बातम्या

Vaibhavi Upadhyay Last Post: वैभवी उपाध्यायची अखेरची पोस्ट व्हायरल, निधनाच्या सोळा दिवसांआधी म्हणाली...

Vaibhavi Upadhyay Social Media Post: अनेकदा सोशल मीडियावर वैभवीने फोटो आणि काही व्हिडीओ शेअर केले होते. आता त्यातील तिची १६ दिवसांपूर्वीची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Vaibhavi Upadhyay Last Social Media Post: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम लोकप्रिय अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे कार अपघातात निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी अर्थात २३ मे रोजी हिमाचल प्रदेशमध्ये अभिनेत्रीचे रस्ता अपघातात निधन झाले आहे. ही ३२ वर्षीय अभिनेत्री सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. पण तिने अनेकदा सोशल मीडियावर वैभवीने फोटो आणि काही व्हिडीओ शेअर केले होते. त्यातीलच १६ दिवसांपूर्वीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीचे हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात निधन झाले आहे. सध्या तिची १६ दिवसांपुर्वीची एक पोस्ट कमालीची चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने काही निसर्गाच्या सान्निध्यातील काही शॉर्ट्स ॲड करत ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने खूप भली मोठी पोस्ट देखील सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

पोस्टमध्ये अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशातील पर्वत, धबधबे, मंदिरे आणि रस्त्यांवरील नयनरम्य दृश्य दाखवले. यामध्ये तिने सांगितले की, हा व्हिडीओ २०१९ चा आहे, जो तिने गेल्या काही दिवसांपूर्वी पोस्ट करत शेअर केला. तसेच या संपूर्ण दृश्याचे तिने वर्णन देखील आहे. 4 वर्ष जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ती पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये खास सफारी करण्यासाठी गेली होती. (Bollywood Actress)

वैभवी उपाध्यायची हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात निधन झाले आहे, तिथे प्रवास करत असताना तिच्या कारचा अपघात झाला. यावेळी तिच्यासोबत गाडीत आणखी देखील काही लोकं होते. मात्र, त्यांच्याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. या अभिनेत्रीच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तिच्या निधनाने टेलिव्हिजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तिच्या अचानक एक्झिटने तिच्या चाहत्यांना, परिवाराला आणि मित्र मंडळींना मोठा धक्का बसला आहे.

वैभवी उपाध्यायने टेलिव्हिजनसृष्टीत मोजक्याच भूमिका साकारल्या आहेत. तिने 'झिरो किलोमीटर्स', 'प्लीज फाईंड अटॅच्ड', 'साराभाई व्हर्सेस साराभाई', दीपिका पदुकोणचा चित्रपट 'छपाक', राजकुमारचा चित्रपट 'सिटीलाइट' सोबतच 'क्या कुसूर है आमरा का', 'संचना' अशा अनेक मालिकांमध्ये तिन काम केले आहे. तिच्या निधनाने टेलिव्हिजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तिच्या अचानक एक्झिटने तिच्या चाहत्यांना, परिवाराला आणि मित्र मंडळींना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dashavatar Collection: एकाच दिवशी 3 मराठी चित्रपट प्रदर्शित; 'दशावतार'ने मोडले कमाईचे रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा वाचून बसेल धक्का

भयंकर जलप्रलय! आभाळ फाटलं, ८ लोकं, दुकानं अन् जनावरं वाहून गेली, देहरादूनमधील ढगफुटीचा VIDEO समोर

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Beed : मुलांच्या शिक्षणासाठी खिशात दमडीपण नाही, मराठा बांधवाने उचलले टोकाचे पाऊल, बीडमध्ये हळहळ

Airport Jobs: १०वी,१२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याची संधी; १४०० पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT