Vaibhavi Upadhyay Dies In Car Accident: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन; टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शोककळा

'Sarabhai vs Sarabhai' Actor Vaibhavi Upadhyay News: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम लोकप्रिय अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे कार अपघातात निधन झाले आहे.
Vaibhavi Upadhyay Dies In Accident
Vaibhavi Upadhyay Dies In AccidentTwitter

Vaibhavi Upadhyay News: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम लोकप्रिय अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे कार अपघातात निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी अर्थात २३ मे रोजी हिमाचल प्रदेशमध्ये अभिनेत्रीचे रस्ता अपघातात निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी  निर्माते जेडी मजेठिया यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Vaibhavi Upadhyay Dies In Accident
Akshay Kumar Visits Kedarnath: कपाळी मळवट, गळ्यात रूद्राक्षाची माळ; केदारनाथच्या चरणी अक्षय कुमार

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम वैभवी उपाध्याय हिचे मंगळवारी सकाळी कार अपघातात निधन झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झालाय. ती ३२ वर्षांची होती. चंदिगड येथील तिचे कुटुंबीय अभिनेत्रीचे पार्थिव मुंबईत आणणार आहेत. वैभवीच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जेडी मजेठिया यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, “आयुष्य खूप अप्रत्याशित आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधील ‘जास्मिन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अतिशय प्रतिभावान अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचे निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये तिचा कार अपघात झाला.” अभिनेत्रीच्या टेलिव्हिजनसृष्टीतील कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने आतापर्यंत सीआयडी, अदालत आणि साराभाई वर्सेस साराभाई या सारख्या मालिकेत तिने काम केले असून तिला ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधील ‘जास्मिन’ भूमिकेने प्रसिद्धी दिली. (Bollywood)

Vaibhavi Upadhyay Dies In Accident
Jacqueline Fernandez In Delhi Court: मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिनला मोठा दिलासा, कोर्टाने दिली परदेशवारीची परवानगी....

वैभवीने दीपिका पदुकोणसोबत 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’मध्ये आणि २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिमिर’मध्येही तिने काम केले आहे. अभिनेता आदित्य सिंग राजपूत २२ मे रोजी मुंबईतील अंधेरी येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडल्यानंतर वैभवीच्या निधनाची बातमी आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com