Jacqueline Fernandez In Delhi Court: मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिनला मोठा दिलासा, कोर्टाने दिली परदेशवारीची परवानगी....

Patiala House Court Permits Jacqueline Fernandez To Travel: जॅकलिनने कोर्टात कामानिमित्त परदेशात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अभिनेत्रीने न्यायालयाकडे केली आहे.
Jacqueline Fernandez
Jacqueline FernandezSaam Tv

Jacqueline Fernandes Allow To Travel: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरमुळे अडचणीत आली आहे. आज ती दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. काही कामानिमित्त परदेशात जाण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती अभिनेत्रीने न्यायालयाकडे केली आहे.

Jacqueline Fernandez
Shah Rukh Khan Fulfill Fans Wish: शाहरूख खान बनला कॅन्सर पेशंटसाठी देवदूत; ६० वर्षीय चाहतीची शेवटची इच्छा केली पूर्ण

जॅकलिनने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला की, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २५ मे ते २७ मे या कालावधीत दुबईला आयफा पुरस्कार (International Indian Film Academy Awards) सोहळ्याला जाण्याची परवानगी दिली आहे. जॅकलिनला न्यायालयाने यापूर्वी आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी २८ मे ते १२ जूनपर्यंत इटलीला जाण्याची परवानगी दिली आहे. (Bollywood News)

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मंगळवारी परदेशात जाण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला होता. त्या संदर्भात अभिनेत्री आज पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली होती. जॅकलिनला जर भारताबाहेर जायचे असेल तर, तिला न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते. यापूर्वीही काही वेळा जॅकलिनने न्यायालयात व्यावसायिक कारणामुळे परदेशवारीसाठी परवानगी मागितली होती.

Jacqueline Fernandez
Gyaarah Gyaarah Teaser: राघव- कृतिका करण जोहच्या वेबसीरीजमध्ये दिसणार; सस्पेन्स थ्रिलर ग्यारह ग्यारहचा टीझर प्रदर्शित

नेमकं काय आहे प्रकरण ?

जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत जोडल्यानंतर, ती कमालीची चर्चेत आली आहे. दोघांचे अनेक खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुकेशला मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याने अनेक मोठमोठ्या व्यक्तींची फसवणूक केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याने फसवलेल्या व्यक्तींच्या यादीत अनेक बड्या सेलेब्रिटींची आणि श्रीमंत लोकांची नावे आहेत. 

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) १७ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसलाही आरोपीच्या जाळ्यात उभे केले होते. या प्रकरणी जॅकलिनची ईडीने अनेकदा चौकशी केली होती. नोरा फतेहीचे नावही या प्रकरणाशी जोडले गेले आहे. सध्या प्रकरणात या दोघींची चौकशी सुरू आहे.

Jacqueline Fernandez
Janhvi Kapoor Trolled: ‘अगं आता हॉटेलमधली उशी पण कमी पडली का?’ जान्हवी झाली पुन्हा एकदा तुफान ट्रोल...

मात्र, जॅकलिनच्या वतीने तिचे वकील प्रशांत यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना नोराचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि जॅकलीनने कधीही नोराविरोधात जाहीरपणे काहीही बोलले नाही, अशा परिस्थितीत मानहानीचा कोणताही खटला नाही, असे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com