Shah Rukh Khan Fulfill Fans Wish: शाहरूख खान बनला कॅन्सर पेशंटसाठी देवदूत; ६० वर्षीय चाहतीची शेवटची इच्छा केली पूर्ण

Fans Last Wish: शिवानी चक्रवर्ती नावाच्या 60 वर्षीय महिलेने, मृत्यूपूर्वी शाहरूखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
Shah Rukh Khan Fulfill Fans Last Wish
Shah Rukh Khan Fulfill Fans Last WishTwitter

Shah Rukh Khan Fan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची फॅन फॉलोविंग आपल्याला माहीत आहे. जगभरात शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुख खानला त्याला मोठ्या पडद्यावर पाहणे म्हणजे अनेकांसाठी पर्वणी असते.

अलीकडेच, पश्चिम बंगालमधील शिवानी चक्रवर्ती नावाच्या 60 वर्षीय महिलेने, मृत्यूपूर्वी शाहरूखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ही महिला गेली अनेक वर्षे टर्मिनल कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्यावर उपचार सुरू असूनही, महिलेला एकदा सुपरस्टारला भेटण्याची इच्छा होती आणि विशेष म्हणजे शाहरुखने तिची इच्छा पूर्ण केली.

शाहरुखच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर माहिती दिली की शाहरुख खान त्याच्या या चाहत्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला आहे. अहवालानुसार, शाहरुख शिवानीशी 40 मिनिटे बोलला आहे. वृत्तांवर दिलेल्या माहितीनुसार किंग खानने शिवानीला आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले आहे. शिवणीच्या मुलीच्या लग्नाला जाणार असल्याचेही त्याने सांगितले. (Latest Entertainment New)

Shah Rukh Khan Fulfill Fans Last Wish
The Kerala Story Crossed 200 Crore: 'द केरला स्टोरी' 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने केले 200 कोटींचे कलेक्शन

शाहरुख खानने तिला आश्वासन दिले की तो तिची नक्की भेट घेईल आणि कोलकाता येथे तिच्या घरी मासे खायला जाईल. फॅन क्लबने ट्विटरवर ही माहिती शेअर करत लिहिले आहे की, "शाहरुख खानने त्याच्या फॅन, शिवानी चक्रवर्ती यांच्याशी 40 मिनिटे गप्पा मारल्या, तसेच तिला आर्थिक मदत करणार असून तिच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. तसेच शाहरुख तिच्या घरी जाऊन तिच्या घरी कोलकाता येथे फिश खाणार आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा नम्र स्टार होता, आहे आणि राहील."

सोशल मीडियावर ही बातमी शेअर झाल्यानंतर लगेचच चाहते शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "मला तुझा खुप खुप खूप तुझा अभिमान आहे! किंग खान!!!!!!!!!! LOVEEEEEEEEEEEEE YOOOOOOOOOOOU!!!!!!" दुसर्‍या एका चाहत्याने लिहिले, "किंग ऑफ हार्ट!!!!, तुझ्या नावाचा टॅटू काढल्याचा मला खूप अभिमान आहे!!"

शाहरुख पठाण या चित्रपटातून ४ वर्षांनी पदार्पण केले आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले. शाहरुखचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट ठरला आहे.

शाहरुख 'जवान' या चित्रपटात दिसणार आहे. अॅटली दिग्दर्शित, या चित्रपटात नयनतारा आणि सान्या मल्होत्रा देखील आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शाहरुख आणि तापसी पन्नू यांचा राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' देखील प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com