The Kerala Story Crossed 200 Crore: 'द केरला स्टोरी' 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने केले 200 कोटींचे कलेक्शन

The Kerala Story Box Office Collection: सुदिप्तो सेन दिगदर्शित 'द केरला स्टोरी' हा चित्रपट अवघ्या ३० करोडच्या बजेटमध्ये बनला आहे.
The Kerala Story Day 9 Collection
The Kerala Story Day 9 CollectionSaam TV

The Kerala Story Crossed 200 Crore On Box Office: 'द केरला स्टोरी' चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले आहेत. चित्रपटाला प्रचंड विरोध होत असताना देखील या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यास यश मिळाले आहे. इतकेच नाही तर चित्रपटाने भरगोस कमाई देखील केली आहे.

'द केरला स्टोरी' हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाला विरोध होत होता. काही राज्यात या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. तर काही राज्यात चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. (Latest Entertainment News)

The Kerala Story Day 9 Collection
War 2 Released Date Out: अखेर प्रतीक्षा संपली! हृतिक रोशनच्या वॉर 2 ची रिलीज डेट आली समोर

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला पार केला असल्याचेही नमूद केले आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाचे एकूण कलेक्शन २०३. ४७ कोटी इतके झाले आहे.

सुदिप्तो सेन दिगदर्शित 'द केरला स्टोरी' हा चित्रपट अवघ्या ३० करोडच्या बजेटमध्ये बनला आहे. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट परदेशात देखील प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री अदा शर्माने देखील सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. तिने लिहिले आहे की, 'भारतीय जनतेचे अभिनंदन! ज्यांनी होर्डिंग लावले, पेंटिंग्ज रंगवली, व्हिडिओ पोस्ट केले, राज्यभर प्रवास केला (टीकेएस थिएटरमध्ये पाहण्यासाठी बंगालहून आसामला जाण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बसचा व्हिडिओ पाहिला).

तुमचा चित्रपट #TheKeralaStory आहे एक मोठा ब्लॉकबस्टर ठरला असून तुमच्या यशात माझा समावेश केल्याबद्दल धन्यवाद. आंतरराष्ट्रीय स्तरावरही #TheKeralaStory अनेकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे हे पाहून आनंद झाला. यूकेमध्ये प्रदर्शित होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत …. यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देश देखील तुमचे संदेश येत आहेत. #adahsharma'

अदा शर्मा या पोस्टवर कमेंट करत असलेल्या चाहत्यांना प्रतिक्रिया देखील देत आहे. तसेच तिने तिसऱ्या आठवड्यातील शनिवारी अनेक प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्याचे देखील सांगितले आहे. अदा या चित्रपटातून रातोरात स्टार झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com