Janhvi Kapoor Trolled: ‘अगं आता हॉटेलमधली उशी पण कमी पडली का?’ जान्हवी झाली पुन्हा एकदा तुफान ट्रोल...

Janhvi Kapoor Gets Trolled Carry Pillow At Airport: सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती उशी घेऊन विमानतळावर स्पॉट झाली.
Janhvi Kapoor Gets Trolled Carry Pillow At Airport
Janhvi Kapoor Gets Trolled Carry Pillow At AirportSaam Tv

Janhvi Kapoor Trolled In Airport: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे. जान्हवी आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले आहे. नेहमीच चित्रपटांमुळे चर्चेत राहिलेली जान्हवी सध्या एका गोष्टीमुळे कमालीची चर्चेत आली आहे. ती कुठेही गेली तरी चर्चा रंगते. सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती उशी घेऊन विमानतळावर स्पॉट झाली.

Janhvi Kapoor Gets Trolled Carry Pillow At Airport
The Kerala Story Crossed 200 Crore: 'द केरला स्टोरी' चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यातही यशस्वी घोडदौड; २०० कोटींचा आकडा पार

जान्हवी कपूर यावेळी एअरपोर्टवर फ्लोरल ब्लू फ्रॉक ड्रेसमध्ये स्पॉट झाली. यावेळी तिने एका हातात तिची बॅग आणि तर दुसऱ्या हातात पांढरी उशी होती. यादरम्यान जान्हवी कारमधून उतरताच पापाराझींसाठी तिने खास पोज देखील दिल्या होत्या. सध्या तिची हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी जान्हवीच्या हातात उशी पाहिल्याने तिच्यावर ट्रोलधाडी सुरू आहे.

जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. एअरपोर्टवर गाडीतून खाली उतरताच तिने तिची उशी हातात घेतली. यावेळी नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहताच अकलेचे तारे लढवत म्हणतात, तिला लांबच्या प्रवासात आरामदायी राहण्यासाठी ही उशी सोबत घेतली आहे असा अदांज बांधला. एक युजर तिला म्हणतो, ‘हॉटेलमधली पण तुला उशी कमी पडली का?’ तर आणखी एक म्हणतो, ‘नक्की कशातून प्रवास करतेय ? विमानातून की ट्रेनमधून’ तर काहींनी ती उशी हॉटेलमधुन चोरल्याची मिश्किल कमेंटही केली आहे. (Bollywood Actress)

Janhvi Kapoor Gets Trolled Carry Pillow At Airport
Parineeti Shared Marriage Decision: चहा नाश्ता आणि...; ‘त्या’ भेटीनंतर परिणीतीने घेतला राघव चड्ढासोबत लग्न करण्याचा निर्णय

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, 'मिस्टर अँड मिसेस माही'चे शूटिंग पूर्ण झाले असून ती या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. सोबतच नितेश तिवारी दिग्दर्शित 'बवाल'मध्ये जान्हवी वरुण धवनसोबत दिसणार असून चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ती ज्युनियर NTR च्या 'देवरा' मध्ये देखील दिसणार आहे. ज्याचे पोस्टर आणि नाव आताच जाहिर करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com