Sangharsh Yodha Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangharsh Yoddha Trailer : मनोज जरांगेंच्या "संघर्षयोद्धा"चा ट्रेलर रिलीज

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Trailer Out : संपूर्ण मराठा समाजाला एकत्र घेवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास "संघर्षयोद्धा"च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Chetan Bodke

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. आजही हे आंदोलन कायम सुरू आहे. संपूर्ण मराठा समाजाला एकत्र घेवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. अशातच "संघर्षयोद्धा" चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केलेली आहे.

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा बायोपिक थिएटरमध्ये, १४ जून २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची घोषणा केल्यापासून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.

ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत त्यांनी काढलेल्या रॅलीपर्यंत असे अनेक किस्से पाहायाला मिळणार आहे. चित्रपटामध्ये मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास, मराठा आंदोलनात त्यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. मराठा समाजाच्या या कार्यकर्त्याचा बायोपिक आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती गोवर्धन दोलताडे यांच्या सोनाई फिल्म क्रिएशनने केली आहे. चित्रपटाचं लेखन गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकरसह अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT