Anand Mahindra Review On Sam Bahadur Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur Movie: विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले; 'सॅम बहादूर' पाहिल्यानंतर केली खास पोस्ट

Anand Mahindra Post: फिल्ड मार्शल सॅम माणकेशा यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटात सॅम माणकेशा यांचा भूमिका विकी कौशलने साकारली आहे. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता उद्योगपती आनंद महिंद्रानीही यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anand Mahindra On Sam Bahadur Movie:

फिल्ड मार्शल सॅम माणकेशा यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. चित्रपटात सॅम माणकेशा यांचा भूमिका विकी कौशलने साकारली आहे. विकी कौशलच्या अभिनयाने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. अगदी हुबेहुब भूमिका साकारल्याने प्रेक्षकांनी विकी कौशलचे खूप कौतुक करत आहेत. आता उद्योगपती आनंद महिंद्रानीही चित्रपटाचे कौतुक केले आहे.

आनंद महिंद्रानी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत विकी कौशलचे कौतुक केले आहे.'जेव्हा एखादा देश त्यांच्या नायकांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करतो. तेव्हा एक शक्तिशाली चक्र तयार होते. विशेषत: सैनिक आणि नेतृत्व आणि धैर्याच्या कथांबद्दलचे चित्रपट खूप स्फूर्ती देतात. यामुळे लोकांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढतो. जेव्हा लोकांना माहित असते की, त्यांच्या धैर्याचा गौरव केला जाईल तेव्हा अनेक लोकांना स्फूर्ती मिळते आणि त्यातून अनेक नायक तयार होतील.

हॉलीवूडने शतकानुशतके हे चक्र निर्माण केले आहे. त्यामुळे आमच्यासाठी असा चित्रपट बनवल्याबद्दल रॉनी स्क्रूवाला यांचे मनापासून धन्यवाद. चित्रपटात काही दोष आहेत पण विकी कौशलने ज्याप्रकारे ही भूमिका साकरली आहे. त्याने अंगावर शहारे येतात. त्याने स्वतः ला सॅम बहादूर या पुरस्कार-विजेत्या व्यक्तिरेखेत स्वतःला रुपांतरीत केलंय. ते खूप कौतुकास्पद आहे. हा चित्रपट नक्की पाहा आणि भारतीय नायकाचा जयजयकार करा'. असं आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे.

'सॅम बहादूर' चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटात सॅम माणकेशा यांचा जीवनप्रवास दाखवला आहे. चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT