Salman Khan Slams Munawar Faruqui Twitter
मनोरंजन बातम्या

Salman Khan Slams Munawar Faruqui: ‘...अन्यथा घराबाहेर जाशील', सलमान खानने मुनव्वर फारूखीला सुनावलं, नेमकं काय घडलं?

Bigg Boss 17 Latest Episode Update: सलमान खान मुनव्वर फारुकीसोबत त्याच्या खेळाविषयी बोलताना दिसत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Weekend Ka War Latest Update

‘बिग बॉस १७’च्या घरात प्रेक्षकांना रोज नव-नवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या आठवड्यामध्ये, टीआरपीच्या यादीत शो पाचव्या स्थानावर पाहायला मिळत आहे.

दिवाळी पार्टीनंतर शोमध्ये नवनवीन रंजक वळण दिसत आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये, सलमान खान मुनव्वर फारुकीसोबत त्याच्या खेळाविषयी बोलताना दिसत आहे. यावेळी सलमानने मन्नारा चोप्राला सुद्धा मुनव्वर फारुकीच्या खेळाबद्दल विचारतो. सलमान खानने विचारलेल्या प्रश्नावर मन्नाराने आपला होकार दिलेला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या सोशल मीडियावर ‘विकेंड का वार’ मधील प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी सलमान खान मुनव्वर फारुकीसोबत त्याच्या गेम प्लॅनबद्दल बोलताना दिसला. पुढेही तू असाच खेळ खेळणार आहेस का?, की काहीतरी नवीन बदल करणार आहे? असा प्रश्न त्याने विचारला. असा प्रश्न ऐकून मुनव्वर फारुकीची बोलतीच बंद होते. सलमान मुनव्वरची कानउघडणी करत असताना दिसला. त्याच्या बदललेल्या शैलीवर सुद्धा त्याने त्याला झापलं. (Social Media)

यावेळी सलमानने मुनव्वरला आणखी एक सल्ला दिला आहे, ‘जर तू तुझे गेम खेळण्याचे मार्ग बदलले तर तुला घराबाहेर जावे लागेल.’ ‘अनेक जणं मुनव्वर तुझा फायदा घेतात,’ असं सलमान मुनव्वर फारूकी म्हणाला. ‘नाही, लोक फायदा घेत नाहीत, मुनव्वर स्वतःच त्यांना आपला गैरफायदा घेण्याची संधी देत ​​आहे,’ असं मन्नारा चोप्रा सलमानला म्हणाली.

दरम्यान, मन्नारा चोप्राही मुनव्वरबद्दल ‘त्याला नात्यांमध्ये स्पष्टता हवी आहे,’ अशी म्हणाली. त्यानंतर सलमान खानने मन्नाराला, ‘तू तुझ्या नात्याबद्दल स्पष्ट आहे का?’ आता या प्रश्नावर ती काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Bigg Boss)

येत्या ‘विकेंड का वार’ मध्ये ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये, ‘खिचडी २’ची टीम प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे. या आठवड्याच्या ‘विकेंड का वार’ला कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्या, अनुराग ढोबळ, जिग्ना व्होरा, मुनव्वर फारुकी, फिरोज खान उर्फ ​​खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत आणि सना रईस खान सध्या हे स्पर्धक घरामध्ये आहेत. तर वाईल्ड कार्ड म्हणून समर्थ जुरेलने ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये एन्ट्री घेतली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

SCROLL FOR NEXT