Sikander Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Sikander'च्या सेटवरून शूटिंगचा VIDEO लीक, दिसली दाक्षिणात्य अभिनेत्रीची झलक

Salman Khan Sikander Movie Shoot Video Leaked : सलमानचा आगामी चित्रपट 'सिकंदर'चे सध्या शूटिंग सुरू आहे. नुकताच शूटिंगचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. ज्यात दाक्षिणात्य अभिनेत्री एक सीन शूट करताना पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याला सध्या जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. ज्यामुळे तो आणि त्याचे कुटुंब चिंतेत पाहायला मिळत आहे. नुकताच सलमान खान रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये कॅमिओमध्ये दिसला होता.

आता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत पाहायला मिळत आहे. तो 'सिकंदर' (Sikander) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता मात्र 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओत चित्रपटाचा एक सीन शूट होताना पाहायला मिळत आहे. सध्या 'सिकंदर' चित्रपटाचे शूटिंग हैद्राबादमध्ये सुरू आहे. तिथून शूटिंगचा व्हिडीओ लीक झाला असून तो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लीक झालेल्या व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सीन शूट करताना पाहायला मिळत आहे. ती मॉनिटर स्क्रीनवर दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये राजवाड्याचे दृश्य दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदाना दिसत आहे. रश्मिकाने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिच्या स्माईलचे चाहते दिवाने आहेत. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.

सलमानच्या (Salman Khan) चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसणार असल्यामुळे चाहते खूपच खुश आहेत. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास आणि निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. 'सिकंदर' हा चित्रपट २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाईजानचा 'सिकंदर'चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT