Sikandar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sikandar : सलमानच्या 'सिकंदर'कडे चाहत्यांनी पाठ का फिरवली? धक्कादायक कारण समोर

Salman khan Sikandar Movie Loss : सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या भाईजानचा (Salman khan) 'सिकंदर' (Sikandar ) चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. 'सिकंदर'मध्ये पहिल्यांदाच सलमान खान आणि साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना ही जोडी पाहायला मिळाली. या चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिकाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.

'सिकंदर' चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. 'सिकंदर' चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपटाचे 91 कोटींचं नुकसान झाले आहे. 'सिकंदर' चित्रपट 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सिकंदर' चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पायरसीचा झटका बसला.

चित्रपटाच्या पायरसीमुळे तब्बल 91 कोटींचं नुकसान झाले आहे. चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा वाईट परिणाम झालेला दिसून आला आहे. अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young) यांनी ऑडिटमधून मिळालेल्या माहितीनुसार, 'सिकंदर'च्या टीमला चित्रपटाच्या पायरेटेड आवृत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

सिनेमाचं बजेट आणि कमाई यांचे ऑडिट केल्यावर असे दिसून आले की,चित्रपटाच्या पायरसीमुळे तब्बल 91 कोटींचं नुकसान झाले आहे. चित्रपट लीक करण्यासाठी हायटेक ट्रॅकिंग टूल्सचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'सिकंदर'ला झालेल्या नुकसानामुळे निर्मात्यांनी इन्शुरन्स देखील क्लेम करण्यात आला आहे.

'सिकंदर' चित्रपट

'सिकंदर' चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. यांच्यासोबत चित्रपटात काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे कलाकारही झळकले. 'सिकंदर' हा ॲक्शन ड्रामा आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर चाहत्यांना वेड लावले आहे. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT