'बिग बॉस'चे कलाकार कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अशात एका 'बिग बॉस' कलाकराने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोशल मिडिया त्याने एक खास पोस्ट केली आहे. 'बिग बॉस 17' चा (Bigg Boss 17 ) अंतिम फेरीत पोहोचलेला स्पर्धक अरुण श्रीकांत मॅशेट्टी आता लवकरच बाबा होणार आहे. अरुण एक ( Arun Srikanth Mashettey)प्रसिद्ध युट्यूबर देखील आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. अरुण दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.
अरुण श्रीकांत मॅशेट्टीची बायको आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यांनी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. अरुणला आधी एक गोंडस मुलगी आहे. आता तो लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. त्यांनी या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की,"कब 2 से 3 और 3 से चार हो गए" त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
व्हिडीओमध्ये अरुणची बायको त्याला आपण प्रेग्नेंट असल्याचे सांगत आहे. मागे त्यांची छोटी मुलगी देखील पाहायला मिळत आहे. अरुण आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच भारी वाटत आहे. व्हिडीओमध्ये ते दोघे सुद्धा इमोशनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. बायकोच्या हातात प्रेग्नंसी किट दिसत आहे.
'बिग बॉस 17'मध्ये असतानाचा अरुणचा खेळ प्रेक्षकांना खूप आवडला. तो शेवटी टॉप 5 पर्यंत पोहचला. मात्र त्याला टॉफी जिंकता आली नाही. 'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारुकी झाला. बिग बॉस 17 हा सीझन चांगलाच गाजला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.