सध्या 'जारण' (Jarann) चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत हा सुपरहिट चित्रपट आहे. 'जारण' पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल पाहायला मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता 12 दिवस झाले आहेत. 'जारण' 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बंपर कलेक्शन केले आहे. 'जारण' चित्रपटाने आतापर्यंत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.
अमृता सुभाष (Amruta Subhash ) आणि अनिता दाते (Anita Date) यांचा हॉरर चित्रपट 'जारण' ने 12 दिवसांमध्ये 3.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात वीकेंडला 1.65 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 'जारण'च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. 'जारण'मध्ये दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन पाहायला मिळत आहे. यासर्वांनी प्रेक्षकांना बांधून ठेवले आहे.
वास्तवाशी नाते सांगणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर 'जारण'ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने या कथेला भावनिक उंची मिळाली आहे. तसेच त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र 'जारण'ची हवा पाहायला मिळत आहे. तसेच अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीमुळे चित्रपटगृहात शोज वाढवले जात आहेत. तसेच प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. 'जारण' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. मनन दानिया सहनिर्माते आहेत.'जारण' चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.