बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अविनाश मिश्रा 'टाइम गॉर्ड' बनला आहे. चुम दरांगला हरवून अविनाशने 'टाइम गॉर्ड'ची बाजी जिंकली. अविनाशला टाइम गॉर्ड बनवण्यासाठी रजत दलाल त्याला मदत करतो.
बिग बॉस नॉमिनेट झालेल्या सदस्यांना नॉमिनेशनपासून वाचण्यासाठी एक टास्क देतात. ज्यात टेबलवर घरातील नॉमिनेट झालेल्या सदस्यांचे फोटो असतात. तेव्हा फोटो उचलण्याच्या झटापटीत करणवीरला (Karan Veer Mehra ) दुखापत होते. फोटो उचलताना रजत दलाल करणवीर मेहराला धक्का देतो. त्यात करणवीरचा चष्मा त्याच्या चेहऱ्याला लागतो आणि त्याच्या चेहऱ्यावर दुखापत होते. करणवीरच्या चेहऱ्याला लागलेले पाहून घरातील इतर सदस्य रजत दलालला (Rajat Dalal) ओरडू लागतात. तेव्हा रजत बोलतो की, "गेम खेळताना लागले आहे." यावर करणवीर खूप भडकतो.
दुसरीकडे अविनाश मिश्रा विवियनला नॉमिनेट करतो. त्याचा फोटो पूलमध्ये टाकतो. यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. अविनाशच्या विरोधात प्रेक्षक बोलत आहेत. तसेच या टास्क दरम्यान ईशा आणि अविनाशमध्ये देखील भांडण झालेले पाहायला मिळाले.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात चाहत पांडे, दिग्विजय राठी, विवियन डिसेना, तीजेंदर बग्गा, करणवीर मेहरा आणि एडिन रोज हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता 'वीकेंड का वार'ला बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच रजत आणि करणवीर मेहरामध्ये झालेल्या वादावर सलमान खान काय मत देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.