Kaumudi Walokar : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे थाटात पार पडले केळवण, पाहा PHOTOS

Kaumudi Walokar Kelvan Photos : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचे केळवण नुकतेच पार पडले आहे.
Kaumudi Walokar Kelvan Photos
Kaumudi Walokar SAAM TV
Published On

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांच्या घरची बनली. मालिका संपल्यावर कलाकारांनी सोशल मिडिया अनेक भावनिक पोस्ट केल्या.

आता मालिकेनंतर कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाले आहेत. सध्या मनोरंजन सृष्टीत लगीन घाई पाहायला मिळत आहे. अशात आता 'आई कुठे काय करते' आरोही देखील तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. आरोहच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचलेली अभिनेत्री कौमुदी वलोकर (Kaumudi Walokar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

अभिनेत्री कौमुदी वलोकर लगीन घाई पाहायला मिळत आहे. अलिकडेच तिची 'बॅचलर पार्टी' झाली आणि आता तिच्या केळवण समारंभाला सुरुवात झाली आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील तिच्या मित्रांनी कौमुदीचे थाटात केळवण पार पाडले आहे. कौमुदीने केळवणाचे फोटो सोशल मिडिया शेअर केले आहेत. आपल्या मनातील भावना तिने पोस्टच्या कॅप्शनला लिहिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

२०२३ मध्ये डिसेंबर महिन्यात कौमुदीचा साखरपुडा पार पडला होता. 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिषेक देशमुख त्यांची पत्नी कृतिका देव, सुमंत ठाकरे आणि अश्विनी महांगडे यांनी कौमुदीचे केळवण केले. कौमुदीच्या केळवणासाठी फुलांची आणि केळीच्या पानांची सजावट करण्यात आली होती. केळवणासाठी अभिनेत्री कौमुदी वलोकर हिने मोरपिसी रंगाची साडी नेसली होती. फोटोंमध्ये कौमुदी खूपच सुंदर दिसत आहे.

Kaumudi Walokar Kelvan Photos
Aaliyah Kashyap : आलियाने बांधली परदेशी बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ; लेकीच्या लग्नात ढोल-ताशाच्या तालावर थिरकले अनुराग कश्यप, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com