Manasvi Choudhary
केळवण सोहळा ही एक महत्त्वाची विवाह परंपरा आहे.
या सोहळ्यात लग्न होणाऱ्या मुलं- मुलींना एकमेकांच्या कुटुंबास जेवणाचे आमंत्रण देतात आणि भेटवस्तू प्रेमाचे चिन्ह म्हणून दिले जाते.
लग्न जन्मल्यानंतर ही पध्दत अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
मित्र-मैत्रिण, नातेवाईक व जवळची मंडळी होणाऱ्या नववधु व वराला जेवण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देतात व यासोबतच भेटवस्तू देखील दिल्या जातात
लग्नाआधी ही एक महत्त्वाची परंपरा आहे असं देखील म्हटलं जाते.
परंतु, ही पध्दत कशी सुरू झाली, केळवण का केले जाते याच्या मागे नेमके कारण काय हे जाणून घेऊया
केळवण हा लग्नाआधी केला जाणारा खास क्षण आहे.
यानिमित्ताने घरातील कुटुंब एकत्र येते व होणाऱ्या नववधु व वराला काही मोलाचे सल्ले दिले जातात.
येणाऱ्या नव्या आयुष्याची सुरुवात कशी कराल, नवं नातं कसे बहरेल याविषयी देखील सांगितले जाते.
पूर्वीच्या काळी दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरी येणे शक्य नसायचे.
त्यामुळे वधु व वराला लग्नापूर्वी नातेवाईक घरी बोलवून त्यांच्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ बनवत व त्यांना खाऊ घालत तेव्हापासून केळवणाचा हा प्रकार सुरु झाला