Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: बिग बॉसच्या ग्रँड फिनालेआधीच एल्विश यादव रोखठोक बोलला; स्पर्धकांबद्दल बरंच काही सांगितलं...

Rajat Dalal-Elvish Yadav: बिग बॉसच्या घरात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. यामध्ये रजत दलालला एल्विश यादव भक्कम पाठिंबा देत आहे. एल्विश यादव पत्रकारांना नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉसच्या फिनालेला आता फक्त एक दिवस बाकी राहीला आहे. उद्या (19 जानेवारी 2025)ला 'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18) ग्रँड फिनाले होणार आहे. ग्रँड फिनालेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता नुकतेच घरात पुन्हा पत्रकार परिषद पार पडली आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून राडा, भांडणे पाहायला मिळत आहे. अनेकांची घरात नाती तुटली तर अनेकांची चांगली नाती झाली.

6 ऑक्टोबर 2024 पासून 'बिग बॉस 18' सुरू झाले होते. करणवीर मेहरा की विवियन डिसेना कोण जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. बिग बॉसच्या घरात नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत घरातील सदस्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहायला त्यांचे समर्थक घरात आले आहेत. हे समर्थक पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना सडेतोड उत्तर देत आहेत आणि आपल्या सदस्याची बाजू मांडत आहेत.

बिग बॉसच्या घरात रजत दलाल (Rajat Dalal) पाठिंबा देण्यासाठी एल्विश यादव आला आहे. विजेता एल्विश (Elvish Yadav) 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता आहे. बिग बॉसने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक पत्रकार एल्विश यादवाला विचारते की, "तू रजतला पाठिंबा देत आहेस पण हा पर्सनॅलिटीचा खेळ आहे. ज्याचे जास्त फॉलोअर्स असणार तो जिंकणार. रजत आक्रमक वृत्तीचा आहे. मग तो जिंकणे योग्य असेल का? " यावर एल्विश म्हणाला, "हा रिअ‍ॅलिटी शो आहे. यात बनावट रुप कसे दाखवणार. तुमच्या कोणत्याही मतांमुळे आमच्या मैत्रीमध्ये बदल होणार नाही."

'बिग बॉस 18'च्या ग्रँड फिनालेला करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना आणि रजत दलाल हे सहा सदस्य पोहचले आहेत. यातून 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT