Bigg Boss 18: 'टाइम गॉड'च्या टास्कमध्ये रजत अन् करण वीर भिडले; एकमेकांच्या तोंडाला काळं फासलं, पाहा VIDEO

Rajat Dalal-Karan Veer Mehra Fight : बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा पाहायला मिळत आहे. 'टाइम गॉड'च्या टास्कमध्ये रजत दलाल आणि करण वीर मेहरामध्ये मोठे भांडण होते. ज्यात दोघे एकमेकांच्या तोंडाला काळा रंग फासतात.
Rajat Dalal-Karan Veer Mehra Fight
Bigg Boss 18SAAM TV
Published On

'बिग बॉस 18' च्या (Bigg Boss 18) घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा गेम प्रत्येक दिवशी वेगळे वळण घेत आहेत. यंदाचा 'वीकेंड का वार' खूप गाजला. विवियन समोर घरातील अनेक सदस्यांचा खरा चेहरा समोर आला. त्यात विवियन शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा आणि ईशासोबत भांडण करतो. आता नुकताच बिग बॉसच्या घरात 'टाइम गॉड'चा टास्क पार पडला.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'टाइम गॉड'चा टास्क पार पडताना दिसत आहे. या टास्कमध्ये रजत दलाल (Rajat Dalal) आणि करणवीर मेहरामध्ये (Karan Veer Mehra) मोठे भांडण होते. बिग बॉसने दिलेल्या 'टाइम गॉड'च्या टास्कमध्ये दोन टीम बनवल्या गेल्या होत्या. त्यात रजत दलाल आणि करणवीर मेहरा एकमेकांच्या आमनेसामने पाहायला मिळाले. टास्कमध्ये गटाने मिळून एक छान चित्र बनवायचे होते. जो गट शेवटपर्यंत छान चित्र काढेल आणि टिकवून ठेवेल. त्या गटातील सर्व सदस्यांमध्ये 'टाइम गॉड'चा अंतिम टास्क खेळण्यात येईल.

'टाइम गॉड' च्या या टास्कमध्ये घरातील दोन टीम एकमेकांची चित्रे बिघडवायला सुरूवात करतात. घरातील सदस्य एकमेकांच्या चित्रांवर रंग टाकतात आणि एकमेकांचे चित्र खराब करतात. प्रोमोमध्ये तुम्ही शेवटी पाहू शकता की, करणवीर मेहराच्या तोंडाला काळा रंग फासला जातो. त्यानंतर करणवीर मेहरा रजत दलालला पूलमध्ये फेकतो. यामुळे रजत करणवीर मेहरावर धावून जाताना पाहायला मिळतो.

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच 'टाइम गॉड'च्या टास्क दरम्यान झालेल्या या कृतीवर सलमान खान करणवीर मेहरा आणि रजत दलालची कशी शाळा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कोण 'टाइम गॉड' होणार हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

Rajat Dalal-Karan Veer Mehra Fight
Bigg Boss 18 : विवियनच्या समोर आला शिल्पाचा खरा चेहरा, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com