2025 मध्ये अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शूटिंगच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर त्यांचा आगामी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी'चे (Mere Husband Ki Biwi) शूटिंग करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शूटिंग दरम्यान सेटवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या सेटवर चक्क छत कोसळले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. कलाकरांनी किरकोळ जखमा झाल्या आहेत. या घटनेवेळी सेटवर अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी उपस्थित होते. तसेच दिग्दर्शक मुदस्सर अजीजही यावेळी तिथे होते.
मीडिया रिपोर्टनुसार, रॉयल पाम्स इंपीरियल पॅलेसमध्ये 'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटाच्या गाण्याचे शूटिंग सुरू होते. गाण्याच्या मोठ्या मोठ्या आवाजामुळे झालेल्या कंपनामुळे हा अपघात झाला. प्रचंड आवाजामुळे सेट हादरला आणि हा अपघात झाला. गाण्याचे शूटिंग करणाऱ्या विजय गांगुलीने सांगितले की, 'मेरे हसबंड की बिवी'सेटवर झालेल्या अपघातात दिग्दर्शक मुदस्सर अजीज जखमी झाले. डीओपी मनू आनंदचा अंगठा फ्रॅक्चर झाला. विजयला स्वतःला कोपर आणि डोक्याला दुखापत झाली. तसेच कॅमेरा अटेंडंटलाही पाठीच्या कण्याला दुखापत झाली.
'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटाचे शूटिंग मुंबई येथील रॉयल पाम्स इंपीरियल पॅलेसमध्ये सुरू होते. तेव्हा अचानक छत कोसळल्याचा मोठा आवाज आला. मीडिया रिपोर्टनुसार,रॉयल पाम्स इंपीरियल पॅलेसमध्ये शूटिंगच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता सीनच्या शूटिंगदरम्यान छत अचानक कोसळले. छताचे काही तुकडे खली पडले. मोठी दुर्घटना होण्यापासून राहिली आहे.
बॉलिवूड कलाकार अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांचे चाहते चित्रपटासाठी खूप खुश असल्याचे पाहायला मिळत आहेत. 'मेरे हसबंड की बिवी' चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.