Dhoom 4: 'धूम 4'मध्ये रणबीर कपूरसाठी साऊथचा खलनायक ठरणार धोका! शूटिंग कधी सुरू होणार? वाचा सविस्तर...

Ranbir Kapoor New Movie Dhoom 4: रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'धूम ४' बद्दल एक मोठी अपडेट आली आहे.
Ranbir Kapoor
Ranbir KapoorSAAM TV
Published On

Dhoom 4: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरसाठी पुढची काही काळ खूप महत्वाचा असणार आहेत. २०२३ च्या शेवटच्या महिन्यात त्याचा अ‍ॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर २०२४ मध्ये तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. त्याचे आगामी दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. पहिला चित्रपट 'लव्ह अँड वॉर' ज्याच्या शूटिंगमध्ये तो सध्या व्यस्त आहे. दुसरे चित्रपट नितेश तिवारी यांचा 'रामायण'. दरम्यान त्याचा आगामी चित्रपट 'धूम ४' बद्दल एक मोठी अपडेट मिळाली आहे.

रणबीर कपूर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटावर काम करत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रात त्याच्यासोबत विकी कौशल आणि आलिया भट्टही काम करत आहेत. दरम्यान, रणबीर कपूर पुढील वर्षी म्हणजेच एप्रिल २०२६ पासून 'धूम ४' चे शूटिंग सुरू करणार आहे.

Ranbir Kapoor
Piyush Mishra Birthday: मृतदेहाच्या बाजूला झोपून काढली रात्र; आज जगप्रसिद्ध संगीतकार, पियुष मिश्रांची भावुक कहाणी

'धूम ४' मध्ये रणबीर कपूरचा लूक पूर्णपणे वेगळा असणार आहे. अशा परिस्थितीत, त्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी, त्याला 'लव्ह अँड वॉर' आणि 'रामायण' यासह इतर सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करावे लागेल. 'धूम ४' च्या प्री-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दोन अभिनेत्री दिसणार आहेत.

Ranbir Kapoor
Maha Kumbh 2025: महाकुंभमध्ये 'स्टार पॉवर' दिसणार! अमिताभ बच्चनपासून ते शंकर महादेवनपर्यंत, जाणून घ्या कोणकोणते सेलिब्रिटी परफॉर्म करणार?

दुसरीकडे, निर्मात्यांना रणबीर कपूरसोबत दक्षिण चित्रपटसृष्टीतील एका खलनायकाची निवड करायची आहे. सध्या ते कोणत्या नावांवर चर्चा करत आहेत हे माहित नाही. पण हे स्पष्ट झाले आहे की खलनायक फक्त दक्षिण चित्रपटांमधूनच निवडला जाईल. एकंदरीत, या चित्रपटात बॉलिवूडचा खलनायक नसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com