Maha Kumbh 2025: महाकुंभमध्ये 'स्टार पॉवर' दिसणार! अमिताभ बच्चनपासून ते शंकर महादेवनपर्यंत, जाणून घ्या कोणकोणते सेलिब्रिटी परफॉर्म करणार?

Celebrities will attend the Mahakumbh Mela: महाकुंभ सुरू झाला असून त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी लोक प्रयागराजला जात आहेत. काही सेलिब्रिटीही या कुंभमेळ्याला जाण्याची तयारीही करत आहेत.
Amitabh in maha kumbha mela
Amitabh in maha kumbha melaSaam Tv
Published On

Maha Kumbh 2025: महाकुंभ २०२५ सुरू झाला आहे. १२ वर्षांनंतर, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे हा कुंभमेळा आयोजित केला जात आहे. या कुंभमेळ्यात सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, सर्वजण त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या धार्मिक कार्यक्रमात देशभरातील लोकप्रिय कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

हे सेलिब्रिटी करतील परफॉर्म

सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, शंकर महादेवन त्यांच्या परफॉर्मने महाकुंभाचे उद्घाटन करतील. तर, मोहित चौहान कार्यक्रमाचा समारोप करतील. याशिवाय, कैलाश खेर, शान मुखर्जी, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ, ऋषभ रिखीराम शर्मा, शोभना नारायण, डॉ. एल. सुब्रमण्यम, बिक्रम घोष आणि मालिनी अवस्थी हे कलाकार देखील महाकुंभात परफॉर्म करुन उपस्थिचत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

Amitabh in maha kumbha mela
Piyush Mishra Birthday: मृतदेहाच्या बाजूला झोपून काढली रात्र; आज जगप्रसिद्ध संगीतकार, पियुष मिश्रांची भावुक कहाणी

तसेच या कुंभमेळ्यात रवी त्रिपाठी (२५ जानेवारी), साधना सरगम ​​(२६ जानेवारी), शान (२७ जानेवारी), रंजनी आणि गायत्री (३१ जानेवारी) हरिहरन (१० फेब्रुवारी), कैलाश खेर (२३ फेब्रुवारी) आणि मोहित चौहानचा ग्रँड फिनाले (२४ फेब्रुवारी) शेवटच्या दिवशी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. यासाठी या सर्व कलाकारांची सांस्कृतिक मंत्रालयाने उत्तम सुविधा केली आहे.

Amitabh in maha kumbha mela
Nora Fatehi : लॉस एंजेलिसमध्ये नोरा फतेही अडकली, प्रचंड घाबरत अग्नितांडवाचा व्हिडीओ केला पोस्ट

या सेलिब्रिटींचाही समावेश असेल

याशिवाय, वृत्तानुसार, हिंदी आणि दक्षिण चित्रपट उद्योगातील अनेक सेलिब्रिटी देखील संगमात स्नान करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. असे म्हटले जात आहे की अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनुप जलोटा, रेणुका शहाणे, आशुतोष राणा, रवी किशन, मनोज तिवारी, अक्षरा सिंग, राखी सावंत आणि इतर स्टार महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला भेट देऊ शकतात. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com