Bigg Boss 18: ग्रँड फिनाले पूर्वी 'या' सदस्याचा बिग बॉसच्या घरातून पत्ता कट, चाहत्यांना मोठा धक्का

Bigg Boss 18 Elimination : बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला तीन दिवस बाकी असताना घरातून एका सदस्यांची एक्झिट झाली आहे. त्या सदस्याच्या जाण्यामुळे चाहत्यांना तसेच घरातील इतर सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.
Bigg Boss 18 Elimination
Bigg Boss 18SAAM TV
Published On

'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18) ग्रँड फिनाले फक्त तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बिग बॉसच्या घराच आता एकामागोमाग एलिमिनेशन होत आहे. गेल्या दीड आठवड्यात पहिली श्रुतिका अर्जुन त्यानंतर चाहत पांडे आणि आता बिग बॉसच्या घरातून अजून एका सदस्याची एक्झिट झाली आहे. या सदस्याच्या जाण्याने घरातील सर्वांना धक्का बसला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून करणवीर मेहराची मैत्रीण आहे.

बिग बॉसचा ग्रँड फिनाले 19 जानेवारीला पार पडणार आहे. चाहते कोण उचलणार बिग बॉसची ट्रॉफी हे जाणून घेण्यास खूप उत्सुक आहेत. अलिकडेच बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक पार पडला. त्यानंतर घरातील सदस्यांना पत्रकरांच्या तिखट प्रश्नांना उत्तर द्यावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देखील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात आता काही होऊ शकते. कोण सुरक्षित होणार आणि कोणाचा प्रवास थांबणार हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.

आता बिग बॉसच्या घरातून शिल्पा शिरोडकरचा (Shilpa Shirodkar ) पत्ता कट झाला आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून शिल्पा आणि करणवीरची मैत्री पाहायला मिळाली आहे. मात्र शोच्या शेवटच्या दिवसांत या दोघांमध्ये देखील भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले. शिल्पा शिरोडकर घरातील गेम तिच्या चाहत्यांना खूप आवडला. शिल्पाला कमी मते मिळाल्यामुळे बिग बॉसच्या घरातून तिची एक्झिट झाली आहे.

'बिग बॉस 18'च्या घरातील सहा सदस्य आता ग्रँड फिनालेला पोहचले आहे. यात विवियन डीसेना, चुम दरांग, ईशा सिंह, रजत दलाल, अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा यांचा समावेश आहे. 19 जानेवारीला रात्री 9.30 वाजता 'बिग बॉस 18'चा ग्रँड फिनाले पाहता येणार आहे. कोण विजेता होणार याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. विजेत्याला 50 लाख रुपये आणि 'बिग बॉस 18'ची भव्य ट्रॉफी मिळणार आहे.

Bigg Boss 18 Elimination
Akshay Kumar : परेश रावल यांच्या हातात मांजा अन् अक्षयची पतंगबाजी; सेलिब्रिटी घेत आहेत मकर संक्रांतीचा आनंद, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com