बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा जुहू येथील बंगला आणि पवना लेक परिसरातील फार्म हाऊस रिकामा करण्यासाठी नोटीस पाठवली होती. या ईडीच्या या नोटीसला त्यांनी आव्हान देत याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ईडीविरोधात याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. १० ऑक्टोबर म्हणजे उद्या यावर तातडीची सुनावणी होणार आहे. क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच या संपत्तीवर टांच आणली होती. २७ सप्टेंबर रोजी ईडीने जारी केलेली नोटीस शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना ३ ऑक्टोबर रोजी मिळाली होती. नोटीस मिळाल्यानंतर १० दिवसांत दोन्ही जागा रिकाम्या करण्याच्या सूचना नोटीसमध्ये दिल्या होत्या.
ईडीची कारवाई मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी याचिकेत दावा केला आहे. या प्रकरणात २०१८ पासून नियमित सहकार्य करत असल्याने या कारवाईची गरज नसल्याचा दावा शिल्पा आणि राज यांनी याचिकेत केला आहे. ही कारवाई २०१८ पासून सुरू आहे. जेव्हा ईडीने अमित भारद्वाजविरुद्ध कथित क्रिप्टो मालमत्ता पॉन्झी स्कीममध्ये गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह अन्य सहआरोपींनी बिटकॉइनच्या रूपात गुंतवणूकदारांची ६ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.