सुनील शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकातील मंगळूर येथील एका गावात झाला होता. सुनील शेट्टीचं बालपण कर्नाटकातच गेलं होतं. सुनील शेट्टी केवळ एक यशस्वी फिल्मस्टार नाही तर मोठा बिझनेसमन देखील आहे.
सुनील शेट्टी आज अब्जाधीश आहे. सुनील शेट्टीने प्रॉडक्शन हाऊसपासून ते रिअल इस्टेटपर्यंत आणि अनेक स्टार्ट अप्सपर्यंत सर्व गोष्टींमध्ये पैसे गुंतवले आहेत.
सुनील शेट्टी यशस्वी निर्माता देखील आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊस 'पॉपकॉर्न एंटरटेनमेंट' ने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'बार आणि क्लब' अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स कर्नाटकमध्ये सुनील शेट्टीच्या मालकीचे आहेत.
सुनील शेट्टीची २०२४ मध्ये १२५ कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती मिळतेय. सुनील शेट्टीच्या पत्नीचे डेकोर सेंटर आहे. त्यातून देखील त्यांना करोडो रुपयांची कमाई होते.
सुनील शेट्टीचे कर्नाटक आणि मुंबईत आलिशान घर आहे. शिवाय अनेक स्टार्ट-अपमध्येही गुंतवणूक केलीय. याशिवाय खंडाळ्यात करोडो रुपयांचे आलिशान फार्महाऊस देखील आहे.
सुनील शेट्टीकडे करोडोंच्या अनेक कार, बाईक आणि वाहने आहेत. सुनील शेट्टीच्या व्यवसायाचे साम्राज्य उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेले आहे.