Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Battle Of Galwan Poster Released : सलमान खानच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. पोस्टरमधील सलमानच्या लूकने लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याचा 'सिकंदर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील झळकली.

आता पुन्हा सलमान आपल्या नव्या धमाकेदार चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमधील सलमान खानचा लूक पाहून चाहते भारावून गेले आहे. पोस्टरमध्ये सलमान खानचे रक्तबंबाळ झालेले शरीर दिसत आहे. तसेच त्यांच्या डोळ्यात एक आग पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचे नाव काय?

सलमान खानचा नवीन चित्रपटात खूप हटके अंदाज पाहायला मिळत आहे. त्याच्या नवीन धमाकेदार चित्रपटाचे नाव 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) आहे. सलमानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' चे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

'बॅटल ऑफ गलवान' कथा

'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे.

हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या यांनी लढले गेले. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती. या संघर्षात दोन्ही देशांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT