Shreya Maskar
आज (25 जून) अभिनेत्री सई ताम्हणकरचा वाढदिवस आहे. तिने आपल्या अभिनयाचे चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
सईने आजवर हिंदी, मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
1 मे ला 'गुलकंद' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
2013 मध्ये 'दुनियादारी' चित्रपटात सई मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीसोबत झळकली. 'दुनियादारी' ही प्रेम आणि मैत्रीची कथा आहे.
2016 मध्ये रिलीज झालेल्या सई ताम्हणकर आणि प्रिया बापटच्या 'वजनदार' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
2020 मध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेला धुरळा चित्रपट रिलीज झाला. यात सई एका खास अंदाजात पाहायला मिळाली.
2015 मध्ये रिलीज झालेल्या 'तू ही रे' चित्रपटात लव्ह ट्रायंगल पाहायला मिळाला.
2015ला सई मैत्रीची धमाल गोष्ट 'क्लासमेट्स' चित्रपटातून घेऊन आली.