Salman Khan Firing case Update: Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Salman Khan Firing case Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; भाईजानआधी २ अभिनेते होते निशाण्यावर, घरांची केली होती रेकी

Salman Khan Firing case Update: सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या‌ तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपींनी याआधी इतर दोन अभिनेत्यांच्या घराची रेकी केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या‌ तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपींनी याआधी इतर दोन अभिनेत्यांच्या घराची रेकी केली होती. सलमान खानच्या आधी ज्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी केली होती, त्या कलाकारांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मोहम्मद रफिक सरदार चौधरी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चौकशीदरम्यान त्याने ही माहिती दिली आहे. आरोपीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ८ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान अभिनेत्यांच्या घरातील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्यानेतर १२ एप्रिलला सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. हा व्हिडिओ लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला पाठवण्यात आला होता.

गुन्हे शाखेने आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. मोबाईलमधून रेकॉर्ड केलेले अनेक व्हिडिओ आणि फोटो पोलिसांनी मिळवले आहे. या व्हिडिओ आणि फोटोंवरुन लक्षात आले की, आरोपींनी फक्त सलमान खानच्या नाही तर इतर दोन अभिनेत्यांच्या घराचेदेखील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितले की, बिश्नोई गँगने त्याला ३ लाख रुपये दिले होते. त्यातील २ लाख शूटर विकी कुमार गुप्ता आणि सागर कुमार पाल यांना दिले होते. यातील विकी कुमार गुप्ताने अनमोल बिश्नोईशी फोनवरुन संवाद साधला होता. याचा पुरावा म्हणून त्याने व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग त्याचा भाऊ सोनू गुप्ताला पाठवले होते. या प्रकरणात सोनू गुप्ताचादेखील जबाब नोंदवण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

दोन वर्षांपूर्वी पंजाबमध्ये झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या अंकित अरोराशी आरोपी सागर पालचे संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सागर पालनेच विकी गुप्ताला बिश्नोई गँगसोबत काम करण्यात तयार केले होते. मोठी रक्कम देईन असे आश्वासनही विकी गुप्ताला दिले होते. दोघांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईला येण्यास सांगितले होते. त्यावेळी त्यांना ४०,००० रुपये दिले होते. त्यांनी मुंबईत काही दिवस राहण्यास सांगितले होते. हे दोन्ही आरोपी काही दिवस पनवेलमध्ये राहिले होते.

बिश्नोई गँगने आरोपींना पनवेलमध्ये एक खोली भाड्याने घेऊन तिथेच राहण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना पैसेही दिले होते. आरोपी मार्च महिन्यात मुंबईत आले होते. कुर्ला येथे त्यांनी आरोपी चौधरीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लान केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT