Salman Khan House Firing Case: अमेरिकेत शिजला गोळीबाराचा कट? बिश्नोई गँगकडून कालू अन् सारंग नावाच्या शूटरची निवड

Salman Khan House Firing Case: सलमानच्या घरावरील हल्ल्याचा कट अमेरिकेत रचण्यात आला. व्हर्च्युअल नंबरनुसार शुटर्सना आदेश दिले गेले. रोहित गोदारा नावाच्या व्यक्तीनं शुटर्सना शस्त्र पुरवली. गोल्डी ब्रारनं सलमानला धमकी दिली त्यावेळी रोहित गोदाराचं नाव पुढे आलं होतं.
Salman Khan House Firing Case Update
Salman Khan House Firing Case UpdateSaam TV

Salman Khan House Firing Case Update:

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. मुंबई क्राईम ब्रांचनं आतापर्यंत ३ जणांना ताब्यात घेतलं असून यातील दोन्ही शार्प शूटरची ओळख पटलीय. एकाचं कालू आहे तर दुसऱ्याचं नाव सारंग असं आहे. दरम्यान या तपासाचे धागेदोरे थेट अमेरिकेपर्यंत पोहचले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार सलमानच्या घरावरील हल्ल्याचा कट अमेरिकेत रचण्यात आला. व्हर्च्युअल नंबरनुसार शुटर्सना आदेश दिले गेले. रोहित गोदारा नावाच्या व्यक्तीनं शुटर्सना शस्त्र पुरवली. गोल्डी ब्रारनं सलमानला धमकी दिली त्यावेळी रोहित गोदाराचं नाव पुढे आलं होतं. राजस्थानमधील हायप्रोफाइल राजू ठेठ हत्याकांड, सुखदेव सिंह गोगामेड़ी हत्याकांड प्रकरणातही यात रोहित गोदारानं शस्त्र पुरवली होती.

प्रत्येक हल्ल्यासाठी बिश्नोई गँग एक टोळी तयार ठेवते. ही टोळी शुटर्सना शस्त्र पुरवण्यापासून हवी ती मदत करते. बिश्नोई गँगची आणखी एक खासियत म्हणजे ते कधीही भाड्यानं शुर्टर्स घेत नाहीत. सलमान खान प्रकरणात दोनपैकी शुटरची ओळख पटलीय.

या शुटरचं नाव विशाल उर्फ कालू असं असल्याचं सांगण्यात येतंय. रोहतकमध्ये याच कालूनं रोहित गोदाराच्या सांगण्यावरून एक बुकी आणि स्क्रॅप डिलर सचिनची निर्घृणपणे हत्या केली होती. याच कारणामुळे सलमानच्या घरावरील हल्ल्यासाठी कालूचीच निवड करण्यात आली होती.

सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर देशभरातील तपासयंत्रणा कामाला लागल्या आहेत. आता महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब पोलीस गुन्हेगारांची पाळंमुळे शोधून काढतायेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com