Thoda Tuza Ani Thoda Maza Serial: 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

Shivani Surve New Serial : मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिवानी सुर्वे. शिवानीने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. शिवानी सुर्वे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
Thoda Tuza Thoda Maza Serial
Thoda Tuza Thoda Maza SerialSaam Tv

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिवानी सुर्वे. शिवानीच्या अभिनयाचे नेहमीच चाहत्यांकडून कौतुक होत असते. शिवानीने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. यानंतर शिवानी सुर्वे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

शिवानी सुर्वे मागील काही दिवसांत अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून मालिकाविश्वापासून लांब होती. परंतु आता लांब ब्रेकनंतर पुन्हा एकदा शिवानी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी सुर्वे स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत शिवानीसोबत अभिनेत्री मानसी कुलकर्णीदेखील दिसणार आहे. मालिकेच्या प्रोमोत शिवानी सुर्वे आणि मानसी यांच्या गुरु- शिष्य हे नातं दाखवलं आहे. मानसी ही शिवानीची गुरु दाखवली आहे. कॉलेजच्या एका कार्यक्रमात मानसी शिवानीला एक चॅलेंज देताना दिसत आहे. मानसी शिवानीला टेबलवरील ग्लास हात न लावता उचलून दाखवायला सांगते. परंतु हे चॅलेंज खूपच अवघड होते. मात्र, शिवानी खूप हुशारीने हे चॅलेंज पूर्ण करते. त्यामुळे तिचे तिच्या बाबांकडून कौतुक होताना दिसत आहे. 'शाब्बास पोरी जिंकलंस तू' असं तिचे बाबा म्हणतात. परंतु ही गोष्ट मानसीला मात्र आवडलेली दिसत नाही. मानसी शिवानीला म्हणते की, 'आता भेटलीस पण पुन्हा भेटू नको, मला हरलेले चेहरे बघायला आवडतात'. त्यानंतर शिवानी मानसीच्या हातातून ट्रॉफी घेते. मालिकेचा प्रोमो खूपच रंजक दाखवला आहे.

Thoda Tuza Thoda Maza Serial
Actor Wife Fraud Case: 'गदर 2' फेम अभिनेत्याच्या पत्नीची ५ लाखांची फसवणूक; पोलिसांनी ४८ तासात लावला गुन्ह्याचा छडा

मालिकेच्या प्रोमोवरुन मानसी आणि शिवानी यांच्यातील नातं काय असणार आहे? याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. शिवानी सुर्वेची ही मालिका लव्हस्टोरीवर आधारित आहे का? मालिकेत काय नवीन बघायला मिळणार आहे? याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. शिवानी सुर्वेची थोडं तुझं थोडं माझं ही मालिका येत्या १७ जूनपासून संध्याकाळी ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे.

Thoda Tuza Thoda Maza Serial
The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com