सलमान खान सध्या 'मातृभूमी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
भाईजानचा एका एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओत सलमान प्रचंड भडकलेला दिसत आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याला एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे होतात. त्यांच्या अभिनयाचे लोक फॅन आहेत. आता सलमान खा लवकरच 'मातृभूमी' या चित्रपटात दिसणार आहे. अशात सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओ हा एअरपोर्टवरील आहे. जेथे सलमान खान जाताना दिसत आहे. तेव्हा चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. या गोंधळात फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाने अचानक मागून येऊन सलमान खानच्या खांद्यावर हात ठेवला. एका अनोळखी व्यक्तीने न विचारता खांद्यावर हात ठेवल्याने सलमानला ते आवडले नाही, तो प्रचंड चिडला आणि त्याला दूर केले. त्या माणसाचा हात बाजूला केला आणि त्याला दूर ढकलले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून तो खूप रागावलेला दिसत होता, तरी त्याने स्वतःला शांत केले. तेवढ्यात भाईजानचे बॉडीगार्ड देखील आहे. विमानतळावर अनेक चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यास उत्सुक होते आणि सलमानने आनंदाने त्यांच्यासोबत पोज दिल्या. एका छोट्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून भाईजानने फोटो काढले.
सलमान खानचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकरी तुफान कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलं की, "त्याने खांद्यावर हात असा ठेवला की, जणू काही तो त्याचा बालपणीचा मित्र आहे." दुसऱ्या युजरने लिहिलं, "सलमानने आपल्या रागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे."
सलमान 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही सज्ज आहे. या चित्रपटाचे पूर्वीचे नाव 'बॅटल ऑफ गलवान' असे होते. अपूर्व लाखिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपटात शौर्य, त्याग आणि जिद्दीचे एक तीव्र आणि प्रभावी चित्रण पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.