Salman Khan AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर भयंकर दुर्घटना; पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय झालं?

Salman Khan Security Police Constable Death : सलमान खानच्या घराबाहेर तैनात असलेला पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सलमान खानच्या घराबाहेर भयंकर घटना

ड्युटीवरील पोलिसाचा जागीच मृत्यू

पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी पोलीस कर्मचाऱ्याचे निधन झाले आहे. सहकाऱ्याचे अचानक निधन झाल्याचे समजताच इतर पोलीसांना मोठा धक्का बसला. पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती दिली की, सलमान खान यांच्या घराबाहेर तैनात असलेल्या गणेश नावाच्या कॉन्स्टेबलची प्रकृती अचानक बिघडली आणि ते जागीच कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

'हम साथ-साथ हैं' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान 'काळी हरणे' (ब्लॅक बक) मारल्याच्या कथित घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला टार्गेट केले आहे, त्यामुळे अभिनेत्याची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अभिनेत्याला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. २०२४ मध्ये, मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या अभिनेत्याच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स' या निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. तपासादरम्यान असे समजले की, हा गोळीबार अभिनेत्याला धमकावण्यासाठी आणि लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेवरून घडवून आणला गेला होता. तेव्हापासून सलमान खानची सुरक्षितता अधिक वाढवण्यात आली.

सलमान खानचे आगामी चित्रपट

सलमान खानचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खान सध्या तेलुगू चित्रपट दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्यासोबत चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. नुकताच सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसला. तसेच भाईजान आता 'बिग बॉस हिंदी २०' चे होस्टिंग करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights : वडिलांच्या संपत्तीवरून घरात भांडण? मृत्युपत्र आणि कायद्याचे 'हे' ३ नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत

Healthy Breakfast: आता कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर राहील नियंत्रणात; सकाळच्या नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: बांद्यात बेकायदा दारुसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवसभरात कमी पाणी पिताय? शरीरावर होतो 'हा' भयानक परिणाम, ८ वा धोका तर जीवघेणा

RBI : EMI वेळेवर भरता आला नाहीतर फोन लॉक होणार नाही, RBI कडून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT