Shreya Maskar
प्रबळमाची हे रायगड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य पठारी गाव आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ७०० मीटर (२,३०० फूट) उंचीवर वसलेले हे गाव पनवेलजवळ आहे.
प्रबळमाची हे पठारी गाव प्रबळगड किल्ला आणि कलावंतीण दुर्ग यांवरील ट्रेकसाठी मुख्य 'बेस कॅम्प' (पायाभूत तळ) म्हणून ओळखले जाते.
पावसाळ्यातील कॅम्पिंगसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. तसेच हे ठिकाणे काजवे पाहण्याच्या महोत्सवांसाठीही एक लोकप्रिय ठिकाण आहे.
मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात परिसरातील दाट जंगले हजारो चमकणाऱ्या काजव्यांमुळे उजळून निघतात. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक रात्रीचा मुक्काम (कॅम्पिंग) करतात.
गवताळ पठार असलेल्या या ठिकाणी मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी वीकेंडला सुट्टी घालवण्याची उत्तम सोय आहे. येथे मोकळ्या जागेत तंबू उभारून राहण्याची आणि अस्सल ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेण्याची सुविधा मिळते.
प्रबळमाची येथून आसपासचे सह्याद्रीचे पर्वत (पश्चिम घाट), माथेरान, इर्शाळगड आणि खालील दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
प्रबळमाची येथे गेल्यावर तुम्ही भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.