Salman Khan Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Birthday : भाईजानचा वाढदिवस 'दबंग' स्टाइलमध्ये साजरा होणार, चाहत्यांना देणार खास भेट

Salman Khan Birthday Night: भाईजानच्या वाढदिवसाची जबरदस्त पार्टी होणार आहे. तर दुसरीकडे सलमान खान चाहत्यांना स्पेशल गिफ्ट देणार आहे. चाहते सलमानच्या वाढदिवसासाठी उत्सुक पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या भाईजानचा उद्या (27 डिसेंबर) ला वाढदिवस आहे. उद्या सलमान खान (Salman Khan) 59 वर्षांचा होणार आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. भाईजानच्या वाढदिवसासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्याला पाहण्यासाठी घराबाहेर उभे राहतात. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर' आणि ' बिग बॉस 18' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सलमान खान बर्थडे पार्टी

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान त्याच्या वाढदिवसाची पार्टी 27 डिसेंबरला ' बिग बॉस 18' च्या सेटवर करणार आहे. बिग बॉसच्या सेटवर सलमानचे सर्व कुटुंब येणार आहे. यात सलमान खान 'वीकेंड का वार' चे शूटिंग करणार आहे. ' बिग बॉस 18'चा गेमही दिवसेंदिवस रंजक होत जात आहे. 'वीकेंड का वार'ला सलमान घरातील सदस्यांची शाळा घेतो. तसेच त्यांच्या खेळाचे कौतुकही करतो.

सलमानचे चाहत्यांना गिफ्ट

नवीन वर्षात सलमान खानचा आगामी चित्रपट 'सिकंदर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिकंदर' (Sikandar Movie) चित्रपट 30 मार्चला रिलीज होणार आहे. चित्रपटासाठी चाहते खूप आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे. सलमान खान आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट देणार आहे. तो 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर उद्या (27 डिसेंबर) रिलीज करणार आहे. या टीझरमध्ये सलमानच्या भूमिकेची झलक पाहायला मिळणार आहे.

'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करणार आहेत. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'सिंकदर'मध्ये सलमान खान दमदार ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. सिंकदर' चित्रपट नवीन वर्षात ईदच्या औचित्यावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खान कायमच त्याच्या कामामुळे चर्चेत राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT